महायुती तुटल्यात जमा! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, दादांमुळे आम्हाला पश्चाताप!!
शिंदे सेनेच्या सामंतांचा भाजपावर विश्वासघाताचा आरोप; दादांना मात्र समर्थन
(विजयकुमार पिसे)
महापालिका निवडणुकांचा राडा सुरू असतानाच राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत बिघाडी झाली. भाजपा,शिवसेना आणि अजीतदादांमध्ये टोकदार संघर्ष सुरू झाला. त्यामुळे महायुती तुटल्यात जमा झाली आहे. केवळ औपचारिक घोषणा राहिली आहे. कारण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्पष्टच म्हणाले, अजीतदादांना महायुतीमध्ये घेतल्याने पश्चाताप होतोय. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपाकडून शिवसेनेचा विश्वासघात झाला असा आरोप केला आहे.
या घडामोडींच्या मागे पुणे आणि पिंपरी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन पक्षानी भाजपासमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी काँग्रेस,उबाठा आणि मनसे हे देखील पंगतीला आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण पिंपरी येथे भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ करताना अजीतदादांबाबत फडणवीस यांनी विचार करावा, असे सांगितले. अजीत पवार यांना महायुतीत घेण्यासाठी राज्यात फडणवीस वगळता अन्य कुणी नेते अनुकूल नाहीत. दिल्लीच्या दबावामुळे फडणवीस यांचाही बहुदा नाईलाज झाला आहे.
नगरपालिकानंतर मनपामध्येही अनेक ठिकाणी महायुतीत फूट पडली आहे. भाजपा दोन्ही पक्षांना वार्यावर सोडून एकला चलो रे भूमिकेत असून शिंदे सेना आणि अजीतदादांची परफट होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर ह्या निवडणुकानंतर जि.प. आणि पं.स.निवडणुकात येणारे रिझल्ट पाहून महायुतीमधून भाजपाच शिंदेसेना आणि अजीतदादा गटाला डच्चू देईल, असे वातावरण तयार होत आहे. आताची महायुती म्हणजे केवळ मजबुरी आहे.
अजीत पवारांवर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे, तरीही त्यांना महायुतीमध्ये भाजपाने सामावून घेतले. पण पवार नॅरेटिव्ह पसरवतात आणि महापालिकेत भाजपाकडूनच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात. पण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. यावेळी चव्हाण यांनी, आम्ही खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. आम्ही (भाजपा) पारदर्शी आहोत.पवारांकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे खाजगी कंपन्यांमार्फत ट्रोल करण्यासाठी पैसा पुरवला जात आहे.
*गाफील ठेवून भाजपाकडून सेनेचा विश्वासघात : राज्यात काही ठिकाणी भाजपाशी युतीचे ठरले होते. पण भाजपाने आम्हाला गाफील ठेवून विश्वासघात केला आहे. आम्ही भ्रष्टाचारी भाजपाविरोधात लढत असून आमचे काम अजीतदादा करीत आहेत. त्यामुळे पवार याविषयी काही म्हणत असतील तर त्यास आमचाही मम असेल.
What's Your Reaction?