साहेबांनी फिरवली भाकरी, कुणी पाहिली?गादेकरांच्या हाती पुन्हा तुतारी।
साहेबांनी फिरवली भाकरी, कुणी पाहिली?गादेकरांच्या हाती पुन्हा तुतारी।
(विजयकुमार पिसे)
साहेबांनी भाकरी फिरवली, असं मिडियाकार नेहमीच अगदी खुबीनं सांगतात. पण कुणी पाहिली खात्री करून. तेच आपलं जुनं नवं। त्यालाच म्हणायचं भाकरी फिरवली.साहेब खूष. बिदागी मिळाली म्हणून हे पण खूष. सगळाच खुषीचा मामला. सोलापुरात साहेबांच्या पक्षाचा कायम सुवर्णकाळ. काळ बदलला. त्यासरशी बदलही हवा. भाकरी फिरवली नाही, घोडा फिरवला नाही तर. त्याची उत्तरं माहितायं. तरीही साहेबांचे विश्वासू, अनुभवी महेश गादेकर यांच्या हाती तुतारी दिली. तीन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील सोलापुरी आले. बैठक घेतली. बंद खोलीत चर्चा केली. गादेकर दुसर्यांदा पक्षाध्यक्ष विराजीत झाले. त्यांच्या समोर आव्हान निश्चित आहे. अनुभवी गादेकर त्यावर मात करतील नक्कीच.
१९९९ मध्ये धर्मण्णा सादूल विधानसभेला उतरले म्हणून लगोलग त्यांची जागा मनोहर सपाटेंना घेतली. बरीच वर्षे त्यांचेच बस्तान. अकलूजनिष्ठ शंकर पाटील, जेऊरचे भारत जाधव, कय्युम बुऱ्हाण, महेश गादेकर, संतोष पवार सगळीच बडी असामी. सपाटे, गादेकर आमदारकीसाठी लढले.
यावेळी काँग्रेसी गेटकेन राष्ट्रवादीत इनकमिंग. सुशीलकुमारनिष्ठ खरटमल शरदनिष्ठ हे आश्चर्य. त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी. कुणाचा कशात पायपोस नाही. महेश गाडेकर कोण? म्हणून आवाज उठवला. म्हणून खरटमलांचा 'धीर' खचला. त्यांनी गुपचूप घाईत हातामध्ये घड्याळ बांधून घेतले. अध्यक्षपदाचा पाळणा हलवण्यासाठी तीन चार पक्ष फिरून आलेले हर्षवर्धन पाटील सुमार निरीक्षक. गादेकरांचे नाव फायनल करूनच चाचपणी केली होती. खरटमलांच्या बिचार्या महेश गाडेकरवर खापर फोडलं गेले.
महेश गादेकर अध्यक्ष झाले. शरद पवार काँग्रेसचे नवीन अध्यक्ष गादेकर यांचं वैशिष्ट्य पहा... पद्मसिंह पाटलांचे ते भाचे. भाजपाचे आ.राणा जगजितसिंह, खा.सुनेत्राताई पवार. पार्थ अजीतदादा पवार. हा सारा गणगोत. इकडे कमळ,घड्याळ एक. तिकडे काँग्रेसच्या हाताने तुतारी वाजवायची आणि सेनेच्या मशाली पेटवायच्या. आहे की नाही गंमत.
What's Your Reaction?