मविआचा एमआयएम करणार घात,२०१७ मध्ये काँग्रेसचे बिघडवले गणित

ध्रुवीकरणाचा महायुतीला लाभ

Dec 12, 2025 - 23:32
 0  230
मविआचा एमआयएम करणार घात,२०१७ मध्ये काँग्रेसचे बिघडवले गणित

 (विजयकुमार पिसे)

महाविकास आघाडीत एमआयएम नको, अशी आग्रही भूमिका ठाकरे सेनेने घेतली, चंद्रकांत खैरेंच्या बैठक़ीत मनसे सोबत आली. पण मविआचा घात अटळ मानला जातो. अशा ध्रुवीकरणाचा महायुतीला लाभ होण्याची शक्यता अधिक असून २०१७ मध्ये मनपा निवडणुकीत एमआयएमने काँग्रेसचा खेळ खराबा केला होता. हा अनुभव बहुदा काँग्रेस विसरली असावी. त्यामुळे काही नेतेगण सुरक्षित पक्षाचा शोध घेत आहेत.

   मनसेमुळे महाविकास आघाडीची शक्ती वाढली, एका नव्या पर्वाची सुरुवात झाली म्हणून अनेकांनी *तुतारी वाजवून *मशालीही पेटवल्या. ही केवळ निवडणुकीची घोषणा नसून, उबाठा, काँग्रेस, शप राष्ट्रवादी, माकपा आणि मनसे या पाच पक्षांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर राजकीय स्थिरता आणि विकासाचे नवे मॉडेल सादर करण्याचे वचन खैरे यांच्या बैठकीत दिले. खैरे निष्ठावंत तितकेच ह्ट्टी. त्यामुळे लोक़सभा निवडणुकीत त्यांच्या नशिबी सतत हार. शिवाय अंबादास दानवेंमुळे खैरेंची आता *खैर राहिली नाही, अशी चर्चा. महाविकास आघाडीत चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार (काँग्रेस) आणि महेश गादेकर (शप राष्ट्रवादी), अजय दासरी, अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, संतोष पाटील, धनंजय डिकोळे (उबाठा) मनसेचे विनायक महिंद्रकर आणि माकपाचे अ‍ॅड.अनिल वासम या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आघाडीत सर्व पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल, अशी ग्वाही दिली जात आहे.

*ताईंनी हा सल्ला नाही मानला?*

   २०१७ मध्ये शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी हेरिटेेजमध्ये माध्यमांसमवेत बैठक घेतली होती. तेव्हा विविध चर्चा झाली. भाजपातील गटबाजीचा काँग्रेसने फायदा उठवावा,असा सल्ला काही माध्यमकर्मीनी दिला होता. एमआयएमबाबत *आम्ही त्यांना सावध केले होते. एमआयएममुळे काँग्रेसला फटका बसेल, ही सूचना ताईंनी तेव्हा गांभीर्याने घेतली नाही. आणि काँग्रेसचा बालेकिल्ला शहर मध्य मतदारसंघात काँग्रेस आणि एनसीपीला एमआयएमने जबर झटका दिला. भाजपाचे तब्बल १७ नगरसेवक निवडून आले. त्याआधारेच आता *शहर मध्य विधानसभा मतदारसंघ भाजपाने *काबीज केला. नुकतेच बिहारच्या निवडणुकीतही काँग्रेसने एमआयएमला गिनले नाही, ओवैसीनी काँग्रेसपेेक्षा सरस कामगिरी केली. बिहारमुळे एमआयएम सध्या फार्मात आहे. त्यामुळे अशा ध्रुवीकरणाचा लाभ महायुतीलाच होण्याची शक्यता अधिक़ आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow