..तरीही ताईंचे मध्य लक्ष्य
..तरीही ताईंचे मध्य लक्ष्य
(विजयकुमार पिसे)
काही भाजपायींमुळे (गिफ्ट) खा.प्रणितीताई यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यांचे लक्ष्य अजूनही शहर मध्य विधानसभा मतदारसंघातच. महापालिकेसाठी पक्षाने 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली. उमेदवारांच्या यादीवर आणि प्रभागावर लक्ष्य घातले तर सर्वच उमेदवार ताईंच्या जुन्या मध्य मतदासंघातच आहेत,असे दिसते. ताईंना खासदार होऊन दीड वर्षं लोटले, त्या दिल्लीत संसद गाजवतात. पण गल्लीत...!
प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी जाहीर केलेल्या यादीत बहुतेक सर्वच प्रभाग मध्य मतदारसंघातील असावेत. प्रभाग क्र.9, प्र14,प्र.22,प्र.15,प्र.17 आणि प्र.21 या सहा प्रभागांमधून 17 उमेदवार दिले आहेत. तर शहर उत्तर एकमेव प्र.11 मध्ये एक आणि दक्षिण सोलापूरमधून (प्र.20 आणि प्र.23) 2 उमेदवार दिले आहेत. काँग्रेस मविआत मोठा भाऊ. ते 45 जागा लढवतील. यापैकी 20 उमेदवार दिले, अजून 25 जाहीर होतील. पहिल्या यादीवरून स्पष्ट आहे, 45 पैक़ी बहुतेक उमेदवार शहर मध्य मतदारसंघातील असतील. नगर पालिका निवडणुकीत ताईंच्या पक्षाने दुर्री गाठली.(फक्त एक आकडी संख्या) 2017 मध्ये सत्ताधारी काँग्रेसने फक्त 14 जागा जिंकल्या. विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नाही. यंदाच्या लढाईत त्यांचे लक्ष्य पुन्हा महापौर. दुर्दैवाने तार्ईंचे निष्ठावंतच त्यांच्याशी काडीमोड घेत आहेत. यामध्ये महापौर आणि महिला सदस्या अधिक. म्हणजे खासदार ताईंवर त्यांच्या पक्षातील महिलांचाही विश्वास राहिला नाही का? सुशीलकुमार शिंदे आणि प्रणितीताईंच्या हातात अख्खा पक्ष होता, आहे. तेव्हाही त्यांचे शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूरकडे दुर्लक्ष असायचे. ताई खासदार म्हणून दिल्लीत गेल्या, तरीही त्यांचे लक्ष्यच शहर मध्य. कदाचित ही 2029 ची तयारी नसावी?
What's Your Reaction?