नाशिकनंतर सोलापुरातही निष्ठावंतांसाठी आमदारांचा एल्गार
विश्वासात न घेताच इनकमिंग, युती आणि तिकीट वाटपही?त्यामुळे जिथे निष्ठावंत, त्यांच्या पाठिशीच संघटन राहणार
(विजयकुमार पिसे)
काल नाशकात उपर्यांना थेट भाजपात प्रवेश देताना महिला आमदार प्रा.देवयानी फरांदे या भावुक झाल्या. आणि निष्ठावंतान्च्या पाठिशी राहणे भाग आहे, असे म्हणाल्या. त्यांनी 40 वर्षापासूनच्या पक्षकार्याचा दाखला दिला. जे नाशकात तेच सोलापुरात, याची प्रतिक्रिया उमटली आहे. विश्वासात न घेताच अर्थात विरोध असतानाही इनकमिंग झाले. युतीची चर्चा आणि तिकीट वाटपातही असेच होत असेल, तर वर्षानुवर्षे पक्षासाठी सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते जिथे जातील, त्यांच्या पाठिशी उभं राहणारच, असा ठाम बाणा सोलापुरातील दोन आमदारद्वय सुभाषबापू आणि विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला. हा एल्गार पक्षाविरोधात मुळीच नाही. तर जे बाहेरून आलेले पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुलाखती घेत आहे. त्याविरोधात आहे. पक्षात इनकमिंगमुळे वाढलेले प्रदूषण हटवण्यासाठी पुकारलेला एल्गार गोदावरीनंतर भीमा,सीनेपर्यंत पोहोचला आहे.
मी 40 वर्षे पक्षात काम करते,मी निष्ठावंत कार्यकर्ती आहे, माझ्यासाठी कधीच काही मागितले नाही. पण आज कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये म्हणून पुढे यावे लागले. या घटनेवरून नाशिकच नव्हे तर राज्यभरात इनकमिंगला प्रचंड विरोध, धरणे आंदोलन, निदर्शने,उपोषणानंतरही याची अजिबात दखल घेतली जात नाही. भाजपा महिला आमदाराचीही मुस्कटदाबी केली जाते. जे नाशकात, तेच कदाचित अन्य शहरांमध्येही होत असले पाहिजे. स्व.अटलजींच्या जन्मदिनीच अशा निंद्य प्रकाराबद्दल चिंता देखील व्यक्त केली जात असल्याचे *लक्ष्यवेध न्यूजमधून अधोरेखित केले होते. तसेच प्रचंड विरोध असतानाही पोलीस बंदोबस्तात संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांनी इनकमिंगचा सोपस्कार पार पाडला. तसाच प्रक़ार सोलापुरातही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ही खदखद गेल्या दोन दिवसात सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधी,पक्षाचे पदाधिक़ारी यांचीही यासाठी संमती असल्याची भावना आहेत. गेल्या महिन्यात दक्षिण सोलापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोर आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी अटलजींच्या जयंती पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम पोबत्ती या सामान्य कार्यकर्त्याने तर बिघडलेल्या आणि बिघडवलेल्या व्यवस्थेचे वस्त्रहरणच केले. यानंतरही कार्यक़र्ते बेदखल होत आहेत, ही बाब जनतेच्याही लक्षात आली आहे.
दरम्यान युतीची चर्चा, जागा वाटपाचे काय, आमदारांच्या मतदासंघात निष्ठावंतांना उमेदवारी की काल परवा आलेल्यांना संधी यावऱ आमदार सुभाष देशमुख आणि आ.विजयकुमार देशमुख व्यक्त झाले. यात चूक काय? असे मत कार्यकर्ते जाहीरपणे सांगत आहेत. इतकेच नव्हे तर दोन्ही आमदारांचे वक्तव्य सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. निष्ठावंत एकीकडे आणि उपरे दुसरीकडे अशी उभी फूट पक्षात पडली आहे. यास कारणीभूत कोण? प्रदेश कार्यालय,स्थानिक संघटना की वरून लादलेले नेतृत्व. या सार्या घडामोडी पाहता गेल्या आठवड्यात एका आमदारांनी या जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती पक्षाकडे केली
*भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना तिकीट न मिळाल्यास, ते ज्या पक्षात जातील, त्यांचा प्रचार आम्ही करणार. ते माझे नैतिक कर्तव्य आहे. 15 दिवसांपूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत, असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले.*
*निवडणूक़ समितीत कोण कोण, हे माहीत नाही. वाटघाटी कोण करणार? आमच्या आईची तब्येत ठीक नाही. सध्या पालकमंत्री यांनाच सर्व अधिक़ार आहेत. तेच उमेदवार निवडणार. त्यामुळे निष्ठावंतांच्या पाठिशी राहणे माझे नैतिक कर्तव्य आहे. भले हे कार्यक़र्ते कोणत्याही पक्षातून लढू दे, असे मत आ.विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.*
*आ.सुभाष देशमुख आणि 1990 पासून पक्षात आहेत. कार्यकर्ता ते सरचिटणीस, अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री अशा जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आज पक्ष इतका वाढला की, काँग्रेसमुक्तच्या नादात भाजपा काँग्रेसयुक्त होत आहे. आणि काल परवा बाहेरून आलेले लोक पक्षाला नैतिकता शिकवत आहेत. ही बाब गंभीर झाली असून नगरपालिका निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित निकाल आला नाही, पक्षासाठी ही धोक्याची घंटा निश्चित आहे. पक्षाध्यक्ष रवीबॉस (रवींद्र चव्हाण) यांनी नाशकात,चंद्रपुरात, सोलापुरात ज्यांच्या हाती कारभार दिला, तिथे काय पेरतोय, हे लक्षात घेतले नाही तर महापालिका निवडणुकीतही नगरपालिकेप्रमाणेच निकाल आले तर आश्चर्य वाटू नये.
What's Your Reaction?