श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी साडेतीन हजार पोलिसांची फौज

१६ ठिकाणी होणार विसर्जन : आठ मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गावर राहणार चोख बंदोबस्त

Sep 14, 2024 - 09:33
 0  33
श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी साडेतीन हजार पोलिसांची फौज

सोलापूर : श्रीगणेशच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने साडेतीन हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. शहरात २० ठिकाणी विसर्जन होणार असून, आठ मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

१७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. शहरातील घरगुती गणपतीसह सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आठ मध्यवर्ती महामंडळांच्या अंतर्गत असलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. सार्वजनिक उत्सव मंडळांच्या वतीने शहरातील विविध भागातून मिरवणुका काढल्या जातात. लेझीम, झांज, ढोल पथकासह अन्य विविध प्रकारचे सांस्कृतिक देखाव्याचे प्रदर्शन करीत या मिरवणुका काढल्या जातात. शहरातील विविध मार्गावर मिरवणुका असल्याने मोठी गर्दी होते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी व मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावला जातो.

*शहरातील मध्यवर्ती महामंडळे*

1) शहरात एकूण आठ मध्यवर्ती मंडळ असून यात, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती महामंडळ, लष्कर मध्यवर्ती मंडळ, पूर्व भाग मध्यवर्ती मंडळ, विजापूर रोड मध्यवर्ती मंडळ, नीलम

नगर मध्यवर्ती मंडळ, होटगी रोड 

②) मध्यवर्ती मंडळ, विडी घरकूल मध्यवर्ती मंडळ यांच्या अंतर्गत शहरातून सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढल्या जातात.

*मोठ्या प्रमाणात तैनात पोलिस बंदोबस्त*

पोलिस उपायुक्त,: ०३

 सहायक पोलिस आयुक्त, ; ०५

 पोलिस‌ निरीक्षक ; २४

 सहायक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक : ७४

 पोलिस अमंलदार,: १०००

पोलिस उपनिरीक्षक : २५ प्रशिक्षणार्थीं

गृहरक्षक दलाचे जवान (महिला व पुरुष

होमगार्ड), '; १५००

एसआपीएफ'च्या : ०२ तुकड्या 

आदी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

*शहरातील विसर्जन करण्यात येणारी ठिकाणे*

१) गणपती घाट, कल्याणी कुंड, कंबर तलाव, (तीन कृत्रिम कुंड), म्हाडा विहीर विडी

२) घरकुल, एमआयडीसी ओपन स्पेस प्रिसिजन फॅक्टरीजवळ (एक कृत्रिम कुंड), 

३) रामलिंग नगर विहीर, अशोक चौक, पोलिस मुख्यालय विहीर, मार्कंडेय उद्यान विहीर,

४) विष्णू मिल विहीर, बसवेश्वरनगर विहीर (श्री अक्कलकोटे यांची), सुभाष उद्यान

५) विहीर आणि हिप्परगा येथील खाण.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow