प्रभाग 26 मधील गीता नगर येथे काँक्रीट रस्त्याचे भव्य उद्घाटन

नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांनी व्यक्त केला आनंद

Nov 5, 2025 - 20:39
 0  31
प्रभाग 26 मधील गीता नगर येथे काँक्रीट रस्त्याचे भव्य उद्घाटन

सोलापूर :  प्रभाग क्रमांक 26 मधील गीता नगर येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून गीता नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेविका सौ. चव्हाण यांना निवेदन दिले होते.

नागरिकांच्या मागणीची दखल घेत सौ. राजश्री चव्हाण यांनी प्रथम पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोन्नती योजनेतून निधी मिळवून ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. आणि अखेर आज काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,

“आम्ही सोलापूर महापालिकेला नियमित कर भरतो, परंतु आवश्यक सुविधा मिळत नव्हत्या. नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आमच्या तक्रारींना प्राधान्य देऊन शासनदरबारी पाठपुरावा करून आमच्या समस्या सोडवल्या. अशा कार्यतत्पर व निःस्वार्थी नगरसेविका आमच्या भाग्यात लाभल्या, हे आमचे सौभाग्य आहे.”

भविष्यात उर्वरित प्रकाशयोजना आणि समोरील रस्ता विकसित करण्याची कामेही नगरसेविका सौ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून पूर्ण होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

या उद्घाटन प्रसंगी संग्रामसिंह चव्हाण, दिगंबर पुकाळे, जगन्नाथ काळे, प्रशांत काळे, मीरा मोकाशी, पार्वती गायकवाड, प्रभा क्षीरसागर, शोभा सोलापुरे, सरस्वती काळे, तसेच भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, ठेकेदार प्रसन्न जाधव, कामाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow