श्रीशैल हत्तुरे यांच्याकडून अंगणवाडींना फ्रीज वाटप
बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या कडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंगणवाडींना फ्रीज वाटप करण्यात आले .

बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे यांच्याकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडींना फ्रिज वाटप करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ मंद्रूप येथील अंगणवाडींना पाच फ्रिज वाटप करण्यात आले. यामुळे पालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी या कार्यक्रमास मंद्रूपचे अपर तहसीलदार सुजित नरहरे मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे,सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान व्हनमाने, एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल भोसले, ऋषिकेश जाधव, डॉ. शिवानंद झळके, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब शिळ्ळे, शिवपुत्र जोडमोटे, बसवराज पनशेट्टी शिवानंद लोभे, बाबूलाल लिगेवान आदी उपस्थित होते. मागील
गेल्या पदरा वर्षापासून आपण तालुक्यात बसवेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळतग्रस्तांना घर बांधून त्यांना संसारोपयोगी साहित्य दिले.आरोग्य व रक्तदान शिबिर,गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित केले आहे.भजन कीर्तन व्याख्यान च्या माध्यमातून समाज जागृती करीत आहे.नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दवाखाना, पोलीस ठाणे, वीज वितरण मंडळ हे अधिक ठिकाणी आपण वेळोवेळी धावून जात आहोत. तालुक्यातील सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा,भाजीपाला खराब होऊ नये यासाठी आपण मतदारसंघातील प्रत्येक अंगणवाडीला फ्रिज देण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार तालुक्यात आपण शंभर फ्रिज वाटणार आहोत.
मंद्रूप येथे या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण हा उपक्रम राबवित आहोत येणाऱ्या काळातही आपण सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचं बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी वाडकर यांनी केले तर आभार विशाल केवटे यांनी मानले.
What's Your Reaction?






