मिळकत कर थकबाकीपोटी मनपाने दोन शाळांचे कार्यालय केले सील

महापालिकेची धडक वसुली मोहिमेअंतर्गत कारवाई

Sep 8, 2024 - 13:12
 0  39
मिळकत कर थकबाकीपोटी मनपाने दोन शाळांचे कार्यालय केले सील

सोलापूर शहरातील मिळकतकर थकबाकीदारांच्या विरोधात महापालिका मिळकतकर विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, मिळकत कर थकबाकी पोटी आज शहरातील दोन शाळांचे कार्यालय व मुख्याध्यापक कक्ष सील करण्यात आले आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या - आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर थकबाकीदारांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज दि.६ सप्टेंबर २०२४ रोजी मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत विजापूर रोड, नेहरुनगर येथील मिळकत क्रमांक ३०१०८४ पोस्ट बेसिक आश्रम शाळा याची माहे सप्टेंबर २०२३ अखेर पर्यंतची थकबाकी २ लाख ११ हजार ७०४ व मिळकत क्रमांक ३०१२२८ प्राथमिक गांधी आश्रम शाळा नेहरूनगर यांची रक्कम ४ लाख ६० हजार ८८६ रुपये इतक्या थकबाकीपोटी दोनही प्रशालांचे मुख्याध्यापक कक्ष व कार्यालय सील करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow