मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी मानाचा वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पती ठरले अशाबाई बाळू अहिरे आणि श्री बाळू शंकर अहिरे, मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज
विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम, अमंगळ !
न घडो मत्सर वर्म
सर्वेश्वर पूजनाचे !!
विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी पायी चालत निघालेल्या दमलेल्या, थकलेल्या डोळ्यांना आता विठूमाऊलीच्य़ा दर्शनाची आस आहे. आज आषाढी एकादशीला वारकरी आणि विठुरायाचं मिलन घडतंय. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल जयघोषाने भाषणाची सुरुवात केली. आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण तिसऱ्यांदा महापूजा मान मिळाला आहे. त्यासोबत आज चार पिढ्याने एकत्र पूजा केली. माझे वडीलही पूजेला उपस्थितीत होते. सुगीचे सोन्याचे दिवस शेतकऱ्याच्या जीवनात येऊ दे, शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, असं साकडं विठुरायाचा चरणी घातलंय, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. त्यासोबत मानाचे वारकरी सौ. अशाबाई बाळू अहिरे आणि बाळू शंकर अहिरे दाम्पत्य उपस्थितीत होते.
अहिरे दाम्पत्याला विठुराच्या पूजेचा मान
विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा वारकरी यंदा नाशिक जिल्ह्यातील दाम्पती ठरले आहेत. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील सौ. अशाबाई बाळू अहिरे वय 50 आणि श्री बाळू शंकर अहिरे वय 55 यांना संधी मिळाली आहे. अहिरे दाम्पत्य गेल्या १६ वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत.
What's Your Reaction?






