दर महिना मिळवता येणार ७६,०००/- हून अधिक वेतन

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे भरती जाहीर

Jul 14, 2024 - 07:26
Jul 14, 2024 - 07:28
 0  43
दर महिना मिळवता येणार ७६,०००/- हून अधिक वेतन
BMC

बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण २६ पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेत महिला आणि पुरुष हे दोघेही सहभागी होऊ. महानगरपालिकेतील ही भरती मुख्यतः रजिस्ट्रार आणि हाऊस ऑफिसर या दोन पदांसाठी आहे. २६ हून अधिक जागा भरण्यासाठी सुरू असलेल्या या भरतीत दिनांक १० जुलै २०२४ पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक १६ जुलै २०२४ पर्यंत सादर करणे अपेक्षित आहे.

  • रजिस्ट्रार आणि हाऊस ऑफिसर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी ४१७/- इतके अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या भरतीसाठी चा अर्ज हा उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्जदाराने त्यांचा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करणे अपेक्षित आहे. हा अर्ज जमा करण्यासाठी १६ जुलै २०२४ ही शेवटची तारीख असेल. त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
    अर्ज जमा करण्याचा पत्ता-BMC Mumbai Latest Job Vacancy 2024: मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि H.O.D. (से. हेल्थ केअर सर्व्हिसेस), के.बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर.के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०
    किती असेल दर महिन्याचा पगार* उमेदवाराची रजिस्ट्रार पदासाठी निवड झाल्यास त्याला दर महिना ७६,८४८/- इतके वेतन असेल.
    उमेदवाराची हाऊस ऑफिसर पदासाठी निवड झाल्यास त्याला दर महिना ७६,१०४/- इतके वेतन असेल.

  • कोण करू शकतो रिक्त पदांसाठी अर्ज
    खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी वय वर्ष ३३ ही वयोमर्यादा आहे
    विविध श्रेणी मधील उमेदवारांसाठी वय वर्ष ३८ ही वयोमर्यादा लागू होईल
    उमेदवार अर्ज भरतेवेळी केवळ एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
    या भरतीमध्ये एका उमेदवाराला एकदाच अर्ज करता येईल.
    खुल्या वर्गातून नसलेल्या उमेदवारांनी त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडीटी अँड नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
    या भरती प्रक्रियेत निवडून आलेल्या उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या वेळी त्या पदे रुजू होणे अपेक्षित आहे. असे न केल्यास तो उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर कोणत्याही भरतीसाठी पुढील तीन वर्षां साठी अर्ज करण्यासाठी पात्र राहणार नाही.
    हे जॉब नोटिफिकेशन, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरू असलेल्या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला जरूर भेट द्या. संकेतस्थळावरील रिक्रुटमेंट हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तिथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या नोकरीच्या संधी बद्दल सविस्तर माहिती मिळेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow