शिंदे परिवाराचा २४ तासात यु टर्न!

शिखर पहारिया 'शहर मध्य' मध्ये लढणार नाहीत काँग्रेसचा संभाव्य तगडा उमेदवार माघारला आणि ते "शिखरा"वरून उतरले!

Sep 20, 2024 - 13:18
 0  997
शिंदे परिवाराचा २४ तासात यु टर्न!

सोलापूर : सोलापुरातून काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच देण्यात येईल, शिखर पहारीया फक्त गणपती दर्शनासाठी आले होते. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख श्री. तिरुपती परकीपंंडला यांनी दिले आहे. 

ते "शिखरा"वर आणि आम्ही! फक्त जय म्हणूया, ह्या शीर्षकाखाली "लक्ष्यवेध" न्यूज़ पोर्टलवर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेक वंचित आणि प्रामाणिक काँग्रेसजण अस्वस्थ झाले होते. काही उत्साही कार्यकर्त्यांनी पत्रकारांना या न्यूज़विषयी उपदेशही केला होता, जे "राज"कारणात "दृढाचार्य" आहेत. असे व्हाट्सअप "सल्ला"गार!!

 २४ तासात शिंदे परिवारांनी यु टर्न घेत शिखर पहारिया हे निवडणूक लढवणार नाहीत, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाच विधानसभा निवडणुकीत संधी दिली जाईल, असे नमूद केले आहे.

शहर मध्य मतदार संघातून प्रणिती ताई तीन टर्म आमदार म्हणून निवडून आल्या. आता त्या खासदार झाल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचाच नैसर्गिक दावा आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत प्रणिती ताई यांना एमआयएम, वंचित आघाडी, माकपा, शरद पवार गट या पक्षांचे इच्छुक उमेदवार सर्वश्री फारूक शाब्दि, श्री.गायकवाड, आडम मास्तर, तौफिक शेख ,अन्य काँग्रेस नेत्यांनी पाठिंबा देत निवडून आणले. आता या ठिकाणी आम्हाला संधी मिळावी ही त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे. मात्र चार दिवसांपूर्वी गणेशोत्सवानिमित्त श्री. शिखर पहारिया यांनी मतदारसंघातील गणेश मंडळांना भेटी दिल्यामुळे ते काँग्रेसचे संभाव्य आणि तगडे उमेदवार आहेत, त्यामुळे पहारिया निवडणूक लढवणार हा नॅरेटिव्ह मेसेज तयार झाला. त्यामुळे अन्य पक्षातील इच्छुक उमेदवार व काँग्रेस पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता पसरली. त्यामुळे शिखर पहाऱीया हे तगडे उमेदवार असले तरी ते निवडणूक लढवणार नाही, हे शिंदे परिवाराकडून जाहीर करणे क्रमप्राप्त ठरले. 

सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पाहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबद्दल सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे. काही जण आणि काही मीडियाद्वारे अनेक समज, गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. शिखर पहारिया हे आपले आजोबा सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी आपल्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे दर्शनासाठी सोलापूरला आले होते, काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखर ते काही मंडळांना भेट दिली होती. मंडळांना भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे, असे कुठेही म्हटले नाही. ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत शिंदे परिवाराकडून दिले आहे, असा जाहीर खुलासा श्री. तिरुपती परकीपंडला, प्रमुख: सोलापूर काँग्रेस कमिटी सोशल मीडिया, प्रसिद्धी विभाग,यांनी समाज माध्यमावर केला आहे.

 पहारिया निवडणूक लढवणार नाही, ही वस्तुस्थिती माहित असताना काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी असा उत्साह दाखवून प्रामाणिक काँग्रेसजणांना निरुत्साहित करण्याचा खोडसाळपणा केला हे अधोरेखित झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow