अ.भा.स्व.सा. विणकर मराठी साहित्य संमेलनाची पर्वणी

२८,२९ रोजी दोन दिवस भरगच्च कार्यक्रम, ग्रंथदिंडी, कवी कट्टा, परिसंवाद,कथाकथन यांची साहित्य मेजवाणी

Dec 27, 2024 - 18:07
Dec 27, 2024 - 18:53
 0  236
अ.भा.स्व.सा. विणकर मराठी साहित्य संमेलनाची पर्वणी

 सोलापूर : श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठान पुणे आणि श्री जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे अखिल भारतीय स्वकुळसाळी (विणकर) मराठी साहित्य संमेलन दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी होत असून, साळी समाजातील कवी, लेखक, कथाकार, रसिकांची मांदियाळी यांची पर्वणी लाभणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष शरदकुमार एकबोटे व संयोजक अध्यक्ष कृष्णा सुरे यांनी दिली.

   कष्टकरी विणकर स्वकुळ साळी समाजामध्ये अनेक नामवंत साहित्यिक असून अशा स्वकुळसाळी सारस्वतांसाठी हे व्यासपीठ आहे. शनिवार २८ रोजी संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री पांडुरंग साखरे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन स्वकुळ साळी समाज ज्ञातीचे विठ्ठल मंदिर येथे सकाळी ११.३० वा होणार त्यानंतर दुपारी १२ वा स्वकुळ साळी मारुती मंदिर येथे ग्रंथदिंडीचे पूजन होणार असून नूतन आमदार श्री देवेंद्रजी कोठे यांच्या शुभ हस्ते ग्रंथदिंडीचा सवाद्य मिरवणूक शुभारंभ संस्थेचे कार्यालय दिशा इन्फोटेक (वालचंद महाविद्यालय) येथून दुपारी १२. ३० वा होणार आहे. या ग्रंथ दिंडीत भगवान जिव्हेश्वर, संत महंत आणि साहित्यिकांच्या वेशभुषेत विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत तसेच पालखीमध्ये, ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा, जिव्हेश्वरांचे साळी पुराण या ग्रंथांचा समावेश आहे. दु.3 वा. कै. वसंतराव एकबोटे साहित्य नगरी, सत्यविजय कन्वेक्शनस हॉल येथे ग्रंथदिंडीचे आगमन व संमेलनाचे उदघाटन दुपारी ४ वा. कुशाग्र फॉउंडेशन संस्थापक अध्यक्ष सी पी साळी व सारिका साळी (नाशिक) यांच्या हस्ते होणार असून पुणे येथील कवियित्री व बालकुमार साहित्यिका डॉ. सौ.संगीता बर्वे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. संजय गणेश (धाराशिव), प्रताप साळी (अंमळनेर) अखिल भारतीय स्व.सा. समाजाचे अध्यक्ष रमेश चिल्लाळ, अखिल महाराष्ट्र स्व.सा. समाजाचे अध्यक्ष अशोक दांडेकर (मुंबई) , वर्ल्ड साळी फॉउंडेशन चे विजय वक्ते (मुंबई), अखिल महाराष्ट्र स्व.सा. समाजाचे महिला अध्यक्षा सौ. अश्विनी मते (मुंबई), शांताबाई केंदोळे, नंदुदादा सपार, डॉ चंद्रशेखर बारगजे (पुणे) , शांताबाई व निवृत्ती गायकवाड, मंचचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सरवदे, जेष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे, जिव्हेश्वर प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष अंबर सरवदे, मंच चे अध्यक्ष कृष्णा सुरे हे उपस्थित राहणार आहेत.

    दोन दिवसिय संमेलनात समरणिका प्रकाशन, निमंत्रितांचे कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम योगसाधना, भगवान श्री जिव्हेश्वर कथासार, परिसंवाद, नवोदित कवीसाठी कवी कट्टा, कथाकथन, चर्चासत्र संमेलनात होणार आहे. 

  संमेलन नियोजन समितीमध्ये जिव्हेश्वर प्रतिष्ठान पुणे आणि जिव्हेश्वर विद्यार्थी विकास मंचचे डा. चंद्रशेखर बारगजे, नरेंद्र गायकवाड, अंबरनाथ ढगे, डा. चंद्रशेखर टोणपे, दत्ता गायकवाड, ज्ञानेश्वर सपकाळ, सुभाष गायकवाड हि मान्यवर मंडळी आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow