सरसंघचालक डॉ. भागवत घेणार जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन

सरसंघचालक डॉ. भागवत घेणार जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन

Sep 4, 2024 - 05:48
Sep 4, 2024 - 05:49
 0  106
सरसंघचालक डॉ. भागवत घेणार जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचा पुणे जिल्ह्यात येत्या ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान प्रवास आहे.

  येत्या गुरुवारी ५ सप्टेंबरला सकाळी ९,३० वाजता श्री क्षेत्र जेजुरी येथील अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वागत करण्यात येईल. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडावरील श्री खंडेरायाचे दर्शन ते घेणार आहेत.तसेच जेजुरी गडावरील द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन आणि कोनशिला उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते होणार आहे. 

तसेच पुणे शहरात काही अंतर्गत बैठका आणि फक्त निमंत्रितांसाठी असणाऱ्या दोन जाहीर कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow