जिथे हिंदू अल्पसंख्य, तिथे जिहादी विचारात वाढ!

शहर उत्तर, मध्य, दक्षिण सोलापूरसाठी विहिंपच्या लोकजागर अभियानात महंत रामगिरी महाराजांचे म्हणाले!लक्ष्यपूर्ती...वर्षपूर्ती!!

Nov 24, 2025 - 17:41
 0  194
जिथे हिंदू अल्पसंख्य, तिथे जिहादी विचारात वाढ!

(विजयकुमार पिसे)

सोलापूर : ज्या ठिक़ाणी हिंदू अल्पसंख्य होतो, तिथे जिहादी विचार वाढतो. शेजारच्या बांगला देशात आपण जे पाहातो, ती वेळ येथील हिंदुंवर आली नाही पाहिजे. त्यासाठी शंभर टक्के मतदान करा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यातील सरला बेट धामचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. विश्‍व हिंदू परिषदेच्या लोकजागर अभियानाअंतर्गत त्यांचे प्रबोधन प्रवचनाचे आयोजन केले होते. विधानसभा निवडणुकीत विजयी लक्ष्यपूर्ती अर्थात 23 नोव्हेंबर ही यशाची वर्षपूर्ती ठरली. यानिमित्त हा उजाळा!!

  गतवर्षी विधानसभा निवडणुकीत शतप्रतिशत उमेदवार निवडून आले पाहिजेे, यासाठी सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात १०० टक्के मतदानासाठी विहिंपने लोकजागर अभियान हाती घेतले होते. निवडून आलेल्या आजच्या राज्यकर्त्यांना याचा विसर पडला असून त्याची जाणीव वर्षपूर्तीच्या माध्यमातून करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या विजयात हिंदुत्ववादी संघटना अग्रेसर होत्या, ही वस्तुस्थिती आहे. होटगी रोड व रामवाडी, लियमेवाडी परिसरात महंत रामगिरी महाराज यांची प्रवचने आयोजिली होती. महंत रामगिरी महाराज यांनी संतांचे वचन आणि शिवाजी महाराजांची नीती तसेच महाभारतामधील धर्म-अधर्म याची उदाहरणे सांगितली. हिंदू धर्म आणि हिंदू समाजाचे हित मतदान करण्यात आहे. मतदानाचे हे शस्त्र चालवण्यासाठी जागरूक रहा, शत प्रतिशत मतदान करा, असे महाराज म्हणाले. 

  महंत रामगिरी महाराज यांनी संतांचे वचन आणि शिवाजी महाराजांची नीती तसेच महाभारतामधील धर्म-अधर्म याची उदाहरणे सांगितली. हिंदू धर्म आणि हिंदू समाजाचे हित मतदान करण्यात आहे. मतदानाचे हे शस्त्र चालवण्यासाठी जागरूक रहा, शत प्रतिशत मतदान करा, असे महाराज म्हणाले. दरम्यान महंत रामगिरी महाराज सोलापुरात आलेनंतर भाषणबंदी नोटिशीवरून पोलिसांबरोबर वादाची ठिणगी उडाली होती. 

   याप्रसंगी लक्ष्मण महाराज चव्हाण अभिमन्यू डोंगरे महाराज, जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, धर्मप्रसार प्रमुख जयदेव सुरवसे, नागेश इनामदार, धनंजय कारंडे, लक्ष्मण महाराज चव्हाण, विष्मय भोसले उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow