'गुरुभक्तीचा दिपस्तंभ'
'गुरुभक्तीचा दिपस्तंभ'
"प्रचंड विद्वता, ज्ञान, संतसाहीत्याचा गाढा व्यासंग, गुरुपरंपरेच्या नित्य सेवेत क्षणभरही खंड न पडू देता 'तूझी चरणसेवा हीच पुजा गुरुराया' हे ब्रीद उराशी बाळगून, अहर्नीष नामचिंतन, भजन, प्रवचन, किर्तन उत्सव, उपासना, साधनेत एकरुप होणारे तरीही भक्तांच्या सुखदुःखाशी आपल्या अंत:करणातून प्रेमाची पांघर घालणारे नाथसंस्थानचे सद्गुरु श्री. गहीनीनाथजी महाराज म्हणजे 'गिता' जगणारे व इतरांना गिता- ज्ञानेश्वरी तत्त्व, गुरुसेवेचा महामंत्र देणारे अध्यात्मक्षेत्रातील योगी व वारकरी संप्रदायातील लखलखणारे दिपस्तंभच आहेत त्यांच्या सहज बोलण्यातून जीवनाचा आनंद सुखाचा मार्ग शांती-समाधानाचे मर्म उकलते ! नाथसंस्थानच्या या ज्ञान आनंद सागराला त्यांच्या .....व्या वाढदिवसादिनी साष्ठांग प्रणिपात करुन त्यांचे कृपाछत्राची छाया भक्तावर अखंड राहो हीच प्रार्थना ! व वाढदिवसदिनी अभिष्ठचिंतन !
सद्गुरु श्री. गहीनीनाथ महाराज ज्ञानी तर आहेतच पण ते.विनम्र व कृपाळू ही आहेत, वस्तुनिष्ठता, वर्तमानकाळाला अनन्य: साधारण महत्त्व देणारे," भक्तांच्यासाठीच जीवन आहे 'त्यांच्या सर्व अडचणी प्रश्न याची सोडवणूक हीच माझी प्राथमिकता कर्तव्य मानणारे, तरीही नाथसंस्थानच्या प्रत्येक उत्सव, उपक्रमाला सामान्यातल्या सामान्य माणसाच्या सहभागातून व्यापक महोत्सवाचा आयाम देणारे प्रसन्न दिलखुलास व्यक्तीत्व आहेत ! |
दिवाळी येते, जाते, आलेला दिवस येतो जातो, काळ पहाता पहाता निघून जातो पण माणसाने मन,भान, चित्त हे ईश्वर चिंतन, नाम, गुरुचरणाच्या सेवेत ठेवावे त्यात जीवनाचे सार आहे हे ब्रीद रुजवण्यात गहीनीनाथ महाराजांची मोठी किमया आहे. 'मन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण' या वचनानुरुप प्रसन्नवदनाने आपले करुन टाकण्याचे 'आपणासारखे करिती तात्काळ, नाही काळ-वेळ तयालागी' सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे. महाराजांच्या विषयीचे चार शब्द लिहीण्यासाठी कागद हाती घेतला ! खरंच महाराजांनी दिनदुबळ्या अज्ञानी कित्येक असाहाय्य लोकांना आधार दिला, ज्ञान, उपदेश, संदेश शिकवणूक, सहज विचार, बोलणे, वागण्यातून धर्माचे माणूसकीचे तत्त्व शिकवले माणसाला माणूस जोडण्याचे सुत्र प्रेमविश्वास भक्तीचे गमक सांगितले व अहर्नीष हे काम संस्थानात चालु आहे.
औशात अडीचशे वर्षाची पावन परंपरा असणारे गुरुपरंपरेची सेवा ही ईश्वरसेवा ही भावना अंतकरणात ठेवून आयुष्याचा प्रत्येक दिवसातील प्रत्येक क्षण व्यतीत करणारे 'नाथसंस्थान' हे अद्वैत धर्म प्रसारक पिठ हे वारकरी भागवत संप्रदायातील पावन तिर्थक्षेत्र बनलेले आहे. त्या संस्थानचा लौकीक वाढवण्यात महाराजांचे कष्ठ परिश्रम मोलाचे आहेत. आनंद, सुख शांती याची प्राप्ती गुरुसेवेच्या माध्यमातून प्राप्त होते. यावर महाराजांचा 'मरवसा तोच अट्टाहासही असतो | गहीनीनाथ महाराज हे ज्ञानसागर आहेत, आनंद सागरही | शांतीब्रह्म ही आहेत. प्रखांड पांडीत्य अंगी असूनही.... विनम्र भाव, त्रध्दयाचा ठाव घेणारी आपुलकीची जवळीक हा स्थायीभाव त्यांचे अंगी आहे. नाथसंस्थानच्या लाखो शिष्याचा प्रचंड भक्तसागरात नामसाधनेत साधना, उपासनेची होडी वल्हवताना शिणवटा न आणता अठरा अठरा तास सतत लोकांसाठी लोकाकरिता भक्तासाठीच जीवन समर्पीत करणारे गहीनीनाथ महाराज हे प्रचंड उजकिंद्र आहे. चैतन्याचा, आनंदाचा स्फूर्तीचा. खळखळणारा धबधबा आहे तसा गंगेप्रमाणे पवित्र, निर्डर झऱ्याप्रमाणे निरागस, चंद्रभागेच्या पाण्याप्रमाणे मन-शरीर बुध्दीला सात्वीक- चैतन्य, प्रदान करणारे प्रेरणास्त्रोत, अध्यात्मविद्योचे महाव्यासपीठ आहे नव्हे नव्हे 'गिता' ज्ञानेश्वरी-भागवत या प्रस्थानस्त्रयीचा संगम म्हणजे सद्गुरु श्री. गहीनीनाथ महाराजांची वाक्प्रचुरता-वाणी मधुरता आहे. त्यांचे जवळ जाल तर ते कळतील ! सतत उत्साही आनंदाचे उधान, 'भक््तीप्रेमाची सदैव उधळण, प्रेमाचा वर्षाव, वात्सल्याची पांघर, आणिं' वडीलकीचा धाक-जबरही त्यांचे सानिध्यात असणाऱ्या भक्तांना अनुभूतीस येतो. नामसाधना, गुरुमंत्र उपदेश, अद्वैत धर्मतत्त्वाची नित्य आचरण, भजन चक्रीभजन, अनुष्ठानातून चितन, ध्यान, मनन, पारायण, गुरुसेवाव्रत्तातून सातत्त्याने सद्विचार, सदाचार, धर्माचरणात घट्ट बांधुन ठेवून सामान्य माणसाचे पंचिक जीवनातले प्रश्न अडचणी, मरगळ, नैराश्य, निरुत्साह, चिंता, आळस, अस्थिरता, क्षणार्धात पळवून लावण्याची ताकद, सामर्थ्य, सिध्दता, कसब आणि योग्यता असणारे गहीनीनाथजी महाराज हे भक्ताचं ज्ञान तथा शक्ती चैतन्य पीठ आहे. महाराज सतत बोलतात, या हातांनी केलेलं कर्म याच हातानी फेडावं लागतं. आजच सन्मार्ग जीवनाचा आरंभ समाधानी जीवन जगा, आपण आनंदी राहून समोरच्याना आनंदी ठेवा | आपले म्हणणे इतरावर लादू नका, सदा आपलाच रेटा अट्ट्हस कुटुंबात प्रपंचातही घातक ठरतो. परमार्थात तर प्रथमत: मी पणा सोड, इतरांचे ऐका, ऐकण्याने ज्ञानसामर्थ वाढते, वाचन पारायणातून अभ्यास, पारायण, ध्यान, चिंतनातून आत्मबल आणि गुरुसेवेतून योग्यता, सामर्थ्य अंगी येते, मन सर्वात आधी स्वच्छ करावे, मन बुध्दी चित अंहकारात मन निरपेक्ष सेवावृत्ती बुध्दीतून त्या प्रभूचरणाला अर्पण करा ! दृष्टी नेहमी सकारात्मक ठेवा, स्वच्छ मन, सकारात्मक विचार दृष्ठी, दातृत्ववृत्तीतू मनुष्याचे हातून सत्कर्म घडते हाच परमार्थ आहे. भोगणे हा संसार तर लाभत असून देखील त्याचा त्याग करणे हा परमार्थ ठरतो ! कांही नको शुध्द मनाने देवाला बुध्दी, दृष्ढनिष्ठेने, शुध्द अंत:करणाने दोन हात व तिसरे मस्तक टेकून दास्यत्व भक्ती करा जीवन उजळून निघेल... 'उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली' म्हणून काळजी, चिंता सोडा... 'गुरुचरणी ठेवीता भाव आपोआप भेटे देव ! गुरुचरणी सेवा करा ! म्हणजे त्याचे हातपाय दाबा, धन द्या, असं नाही ! 'नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्ल॑भ तया जवळी' जीवनाचे सुत्र, सुखाचे गमक लक्षात घ्या ! या जीभेवर इंदीयावर काबू-अंकुश ठेवा | संस्कृती धर्म, याचे पालन करा ! आपली वाणी मधुर, सत्य, असेल तर आपले मुखातून निघालेला शब्द हा माणसामाणसांचे क्रदय एकमेकाशी जोडेल, विश्वास, दयाभाव, त्यात हवा ! किती वेळ भजन पुजा केली या पेक्षा किती निष्ठेने मावभक्तीने करतो याला जसे महत्त्व तसेच जीवनाचे ही आहे. जीवनाचा ताळेबंद स्वच्छ स्पष्ट चांगला निघण्यासाठी किती दिवस जगाला त्यापेक्षा कसा जगला ! यालाच विशेषत्त्वाने प्राधान्य आहे, महत्त्व आहे. त्यासाठी जीवन आनंदी व्हायला स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंद वाटण्याला शिका ! इतराचे दुखाला हलके करणे, ही एक देवपुजाच आहे ! . |
हे सारं सहज बोलताना, गहीनीनाथ महाराजांकडे कधी जाल तर ते सतत अगदी मन मोकळे, प्रस्न, आनंदी, खळखळून हसून, अगत्याने. प्रत्येकाचे उत्स्फूर्त स्वागत करताना:दिसतात त्यावेळी वाटते काय रसायन आहे ? महाराजांना संस्थान-गादीच्या सेवेत किती रस आहे. भक्ताच्या सानिध्यात मेळ्यात रमून त्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्यात किती ओठ आहे. तळमळ आहे हे लक्षात येतं ! वडील बंधुन गोरखनाथ महाराजांची खंबीर साथ, श्री. गुरुगादीचे मालक सद्गुरु गुरुबाबांची तपश्चर्या व आर्शिवाद, समर्थ ज्ञानेश्वर महाराजांची गुरुकृपा व परंपरेची पुण्याई, आईसाहेबांची वात्स्ल्यपुर्ण छाया, भक्तांचा अथांग असा मेळा, संस्थानच्या उत्सव, उपासना, साधना, नित्यनेमाची सतत असणारी मालीका, संत महंताचा संस्थानातील वावर हा सारा भगवत् महामेळा निरंतर चालत असताना आनंद, उत्साह, सुख समाधानाची बरसात होते.
त्यांचे आजचे वाढदिवसादिनी त्यांचेसाठी तर परमात्मा पांडूरंगाला आम्ही सारी भक्तमंडळी लोटांगण घालुन मागणं मागतो आम्ही ही गुरुसेवा करतो, देवपूजा, नाम, साधनेत सहभागी होतो, किंवा आमचे नसले तरी आमच्या आईवडीलांची जी कांही पुण्याई असेल त्याचं फळ आम्हाला दे ! माऊली महाराजांच्या, वीरनाथ मल्लनाथांच्या पूढे निरपेक्ष भावनेनं एकच मागतो ! समुदाय भक्त शिष्य परिवार आनंदी राहावा, तूझी सेवा करु इच्छिणारे आम्ही समाधानी असावेत असे वाटत असेल तर आमच्या गहीनीनाथ महाराजांना आनंदी प्रसन्न ठेव, लाखाचा कोटी कोटी सामान्य जीवाचा पोशींदा-मार्गदर्शक, दिपस्तंभ लखलखीत राहाण्यासाठी त्या ज्ञानभक्तीच्या पणतीतील वातेवर कधी काळजी येवू देवू नको आम्हा साऱ्यांचे थोडथोडे आयुष्य काढून घे ! आमची सेवा, सत्कर्म पुण्याई तूझ्या चरणी वाहतो वहीनीसाहेब 'गिताई' यांचे पश्चात महाराजांचे आरोग्य चांगले सदृढ निरोगी होवून त्यांना दिर्घायुष्य लाभू दे ! साऱ्यांची काळजी करणारे साऱ्यांना सांभाळणारे आमचे श्री. गहीनीनाथ महाराज असेच खळखळणारे हास्यात सदैव राहू देत हीच प्राथना आमची आहे. मोठी असणारी माणसं ही समाजाचं दुख: आपलं मानतात व देह समर्पणाला ही तयार असतात त्यासाठी आजही समर्पणाची उत्कट भावना औसेकर गुरुगादीवर लाखो शिष्यांची आहे. प.पुज्य गहीनीनाथ महाराजांचा 66 व्या वाढदिवसादिनी त्यांचे चरणी कोटी कोटी प्रणाम करुन सद्गुरु व परमात्मा पांडूरंगाने त्यांचे हातून भगवत्धर्म कार्य, गुरुगादीची सेवा भक्ताचा सांभाळ, समर्थपणे होवो हीच प्रार्थना ! वाढदिवसानिमित्त, अभिष्ठचिंतन, नम्न वंदन करुन माझ्या शब्दसेवेला विराम देतो.
शाम कुलकर्णी, विधिज्ञ
गुरुभक्त, नाथ संस्थान औसा
मो.नं. 9421363782, 9588601619
श्री गुरुचरणी दंडवत !
लक्ष्यवेध न्युज परिवाराच्या वतीने श्री ह.भ.प गहिनीनाथ महाराज यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा...
श्री गुरु महाराज यांना दीर्घायुष्य लाभो हि विठुराया चरणी प्रार्थना,
विजयकुमार पिसे
संपादक लक्ष्यवेध न्यूज
विभागसहमंत्री विश्व हिंदू परिषद
What's Your Reaction?