फ्लॅट लाटणारे आदर्श कृषीमंत्री कोकाटे
फ्लॅट लाटणारे आदर्श कृषीमंत्री कोकाटे

राष्ट्रवादी भ्रष्टवादी असाच शिक्का बसला तर आश्चर्य वाटू नये. पण हा डाग भाजपला भविष्यात बसला तर? माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आजी कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे. दोघेही राष्ट्रवादी. अर्थात एकाच नाण्याच्या दोन बाजू. कोकाटे वकील तेही सधन. बनावट कागदपत्र करून स्वत:ला गरीब केले आणि 1995 मध्ये मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या मुख्यमंत्री कोट्यातून नाशकात दोन फ्लॅट (सदनिका) बळकावले. अशोकराव चव्हाणांचा आदर्श घोटाळाही असाच. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली. नैसर्गिक न्यायाने कोकाटेंचीही गच्छंती अपेक्षित आहे. तसे यत्िंकचितही होण्याची शक्यता कमी. अजीतदादांची की देवाभाउंची मजबुरी?असो. एक रुपाया भिकारीसुध्दा भीक घेत नाही, मात्र आम्ही एक रुपयात शेतकर्यांना पिकविमा देतो. भिकार्यासारखी उपमा देउन माणिकरावांनी राज्यातील तमाम बळीराजावर उपकारच केले म्हणा. राज्यात मिडिया निशाण्यावर फक्त बीड जिल्हा आहे. नाशिककडे बघणार कोण? शासकीय कोट्यातून दोन फ्लॅट बळकावल्याबद्दल जिल्हा न्यायालयाने कृषीमंत्री कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला. अशी शिक्षा सुनावल्यानंतर प्रथमदर्शनी राजीनामा दिला पाहिजे हा आदर्शवाद अण्णा हजारेंनी लगेच बोलून दाखवला. अण्णा एरवी बोलत नाहीत हं. म्हणून त्यांचा आदर्श बेदखल. मात्र न्यायालयाच्या निकालाची प्रत विधानसभा अध्यक्षांकडे शीघ्रतेने पोहोचविली तरी अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारकी अपात्रतेची कारवाई करण्याची शक्यता किती? कालापव्यय. वरिष्ठ न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर कोकाटेंची आमदारकी शाबूत. हा जर..तर..चा मामला. राजकारणी लाभ घेण्यासाठी कोणत्या थरापर्यंत जातात त्याचे हे मासलेवाईक उदाहरण. माणिकराव कोकाटे सधन आणि वकील पण गरीबांच्या हक्काचे घर लाटण्यात वाकबगार आहेत. त्यांचा आदर्शवाद मुळीच भ्रष्टवाद नाही....त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृषीमंत्र्यांचा हा आदर्श घेतलाच पाहिजे.
What's Your Reaction?






