आणखी एकाचे पालकत्व!
राज्यात देवेंद्र आणि सोलापुरात देवेंद्र ही टॅगलाईन जोरात चालली. देवेंद्र कोठे आमदार झाले. नरेंद्र काळे यांच्याबाबतही महसूलमंत्री बावनकुळे यांचीही अशीच भूमिका असावी. त्यामुळे आणखी एका पालकत्वाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सोलापुरात 'देवेंद्र' आणि 'नरेंद्र' असे नवे समीकरण रूढ होऊ शकते

(विजयकुमार पिसे)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मूर्ती वाटपाचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते, खा.विकास महात्मे व आ. गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पार पडला. काळे यांना अध्यक्षपदाची संधी डावलल्यामुळे धनगर समाज व ओबीसी घटक नाराज असल्याची कसर राहू नये म्हणून बावनकुळे आवर्जून हजर राहिले. नरेंद्र काळे हिरा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यामुळे काहींच्या भुवया उंचावल्या. तर काळे समर्थकांनी भंडारा उधळला. काळे यांच्या पाठिशी राहण्याची ग्वाही दिली. तसेच प्रदेश स्तरावर जबाबदारी देणार असल्याचेही समजले.
प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्ष म्हणून त्यांची चांगली ट्यून होती. पण कथानकात पुढे ट्वीस्ट झाले. बावनकुळे यांना हिरा सापडला, पण हाताळण्याचे पालकत्व किती पेलतील. कारण आता बावनकुळे संघटनेतही राहणार नाहीत. महसूलमंत्री म्हणून वजन मोठे राहणार. हे वजन काळे यांच्या भवितव्यासाठी तडीस नेतील असेच मानायचे? भाषणातून जाहीरपणे बोलणे आणि प्रत्यक्ष अनुभव असे बरेचदा होते.
अनेक मंत्री व नेत्यांनी काही कार्यकर्त्यांचे कायमच पालकत्व घेतल्याची कैक उदाहरणे सोलापुरात आहेत. तशी यादीच करावी लागेल. असो.. तूर्तास कोठे पाठोपाठ काळे यांचेही चांगभलं होणार असे समजू या.....
What's Your Reaction?






