गीतगंगा फौंडेशनतर्फे घोंगडे वस्ती येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद

सोलापूरच्या घोंगडे वस्तीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. १७२ नागरिकांची तपासणी, ११ जणांचे रक्तदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी आणि SIR मतदान नोंदणी करण्यात आली

Jul 14, 2026 - 00:03
Jul 14, 2026 - 00:08
 0  3
गीतगंगा फौंडेशनतर्फे घोंगडे वस्ती येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद

सोलापूर,: घोंगडे वस्ती विराट हिंदू संमेलन समिती व गीतगंगा सोशल फाऊंडेशन आणि मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घोंगडे वस्ती येथील घोंगडे वस्ती भागातील नागरिक व रहिवासी यांचेकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन यशस्वीपणे पार पडले. 
    शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषध, शुगर, रक्तदाब, डोळे व दंत तपासणी डॉ. करण आकुडे यांनी केली. तसेच मोतीबिंदू तपासणी डॉ.राजशेखर जेउरे यांनी केली.  व पात्र रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. सोबत एसआयआर मतदान प्रक्रिया करण्यात आली.  या उपक्रमाचा घोंगडे वस्ती परिसरातील माता भगिनी व पुरुष मंडळ आदी 172  जणांनी घेतला. यानिमित्त रक्तदान शिबिरात 11 जणांनी रक्तदान केले. 


     या शिबिराचे आयोजन घोंगडे वस्ती विराट हिंदू संमेलनाचे संयोजक नितीन शेजुळ व गीतगंगा फाऊंडेशनचे संस्थापक प्रमुख व्यंकटेश कंची, मुख्यमंत्री सहायता कक्ष संयोजक कैलास चौधरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, भटक्या विमुक्त प्रांत कार्यकर्ते अशोक संकलेचा, जिल्हा सेवा प्रमुख श्री करपे, गीतगंगा फाऊंडेशन सचिव चंद्रकांत कंची, खजिनदार वेणुगोपाल उत्तुर, दयानंद नगर कार्यवाह चंद्रकांत जक्कन,  नगर सेवा प्रमुख गणेश मादगुंडी, राकेशचंद्र केसरवाणी, विनायक मादम, विनायक सामलेटी, परमेश्‍वर क्षीरसागर, श्रीनिवास दासरी व हेडगेवार रक्तपेढीचे रवी कोटा यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
   या शिबिरास आ.विजयकुमार देशमुख, नगरसेवक ज्ञानेश्‍वर म्याकल, नगरसेवक राजकुमार पाटील व मंडल अध्यक्ष दत्ता बडगू यांचीही उपस्थिती लाभली. प्रास्ताविक चन्नेश इंडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समिती सदस्य रवी दासरी, अनिल म्हंता, प्रभाकर बिंगी, नरेश म्हंता, भालचंद्र गालपल्ली, सत्यनारायण नडीमेटला, नागेश मलजी यांनी परिश्रम घेतले. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow