मोदी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला जाणार? कारण काय?

परराष्ट्र मंत्रालयाची मोठी माहिती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पण, भारत-पाकचं नातं पाहता मोदी पाकिस्तानचं हे निमंत्रण स्विकारतील की नाही हे पाहावं लागणार आहे.

Aug 31, 2024 - 08:14
 0  150
मोदी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला जाणार? कारण काय?
narendramodi

इस्लामाबाद: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निमंत्रणावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे (MEA) कुठलीही अपडेट नाही. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत पाकिस्तानने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवल्याचं सांगण्यात आलं आहे.

"आम्हाला एससीओ बैठकीसाठी पाकिस्तानकडून आमंत्रण मिळाले आहे. आमच्याकडे याबाबत कोणतेही अपडेट नाही", असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं.परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑक्टोबरमध्ये इस्लामाबादमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित केले आहे.
या वर्षी पाकिस्तान शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) चे रोटेशनल अध्यक्ष म्हणून ऑक्टोबरमध्ये दोन दिवसीय SCO शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. "१५-१६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी देशांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे", असं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow