युवा महोत्सवामुळे विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर ; गुरुवारी निर्णय

युवा महोत्सवाची घोषणा होण्यापूर्वी परीक्षेच्या वेळापत्रकाचा विचार केलेला नाही, असे दिसते. त्यामुळे आता युवा महोत्सवाचे वेळापत्रक पाहून कलाकार विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नवे वेळापत्रक तयार केले जाईल.

Sep 1, 2025 - 13:21
 0  34
युवा महोत्सवामुळे विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर ; गुरुवारी  निर्णय

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ७ ते १० सप्टेंबर दरम्यान सांगोला महाविद्यालयात होणार आहे. दुसरीकडे विद्यापीठाची परीक्षा २३ सप्टेंबरपासून नियोजित आहे. त्यामुळे महोत्सवाच्या तयारीतील विद्यार्थ्यांसमोरील चिंता वाढली असून परीक्षेमुळे महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा १५ दिवस लांबणीवर पडू शकतात. त्यावरील अंतिम निर्णय ४ सप्टेंबर रोजी कुलगुरू घेणार आहेत.

युवा महोत्सवाची घोषणा होण्यापूर्वी परीक्षेच्या वेळापत्रकाचा विचार केलेला नाही, असे दिसते. त्यामुळे आता युवा महोत्सवाचे वेळापत्रक पाहून कलाकार विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नवे वेळापत्रक तयार केले जाईल. त्यासंदर्भात गुरुवारी (ता. ४) कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांची बैठक होणार आहे. त्यानंतर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार की नेहमीप्रमाणे वेळापत्रकात बदल होणार हे स्पष्ट होणार आहे.

युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यानुसार नेमकी किती दिवस परीक्षा लांबणार, याकडे सुमारे ७० हजार परीक्षार्थीचे लक्ष लागले आहे.

एन प्लस-२'चा निर्णय नाहीच
विद्यापीठाने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यासाठी 'कॅरिऑन'चा निर्णय घेतला. त्यानुसार अभियांत्रिकीसह बीए, बी, कॉम, बीएस्सी, एम, एम.कॉम, लॉ अशा सर्वच अभ्यासक्रमातील विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या वर्षात नापास झाला, तरी त्यास तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार आहे. दुसरीकडे मात्र, ज्यांचे शिक्षण पाच-सात वर्षाच्या काळात पूर्ण होऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांना आणखी दोन संधी देण्यासंदर्भात विद्यापीठाने निर्णय घेतलेला नाही. आता विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयाकडून तसे विद्यार्थी किती, याची माहिती मागविली आहे. मात्र, येणाऱ्या परीक्षेत त्यांना संधी नसणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow