ए.आय.चा तंत्र यशस्वी,एसीएस हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या तीन हृदय शस्त्रक्रिया
हृदयविकारासंबंधी वैद्यकीय क्षेत्रात भरारी

सोलापूर : ए.आय. तंत्राने हृदयरोगावरील तीन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया एसीएस हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या साथीने डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी यांनी केल्या, अशी माहिती डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत आयव्हस, रोटा अब्लेशन, बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रास आदी पद्धतींचा वापर करताना यात ए.आय.तंत्र वापराने शस्त्रक्रियेचे निदान केल्यास अचूकता वाढते हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. याविषयीच्या कार्यशाळेत डॉ. जसकरणसिंग यांनी मार्गदर्शन केले.
पुणे येथील एका रुग्णाची वर्षभरापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. पण सहा महिन्यातच त्याची रक्तवाहिनी बंद पडली. तसेच तीन महिन्यांपूर्वी एन्जोप्लास्टीही केली होती. तरीही रुग्णाचा त्रास कमी झाला नाही. सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया केली. तसेच सोलापूर आणि धाराशिव येथील अन्य रुग्णांच्याही शस्त्रक्रियेचे निदान ए आय द्वारे करण्यात आले. या दोन्ही शस्त्रक्रिया प्रत्येकी दीड तास चालल्या. उपचारानंतर गुरुवारी या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.पत्रकार परिषदेस डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड उपस्थित होते.
0या शस्त्रक्रियेत मोलाचे योगदान दिलेले डॉ. जसकरणसिंग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोग तज्ञ असून मुंबईच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तर डॉ. प्रमोद पवार यांनी चेन्नई येथील मद्रास मिशन हॉस्पिटल व कोची येथील लिसी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेतले आहे.
00एक वर्षभरापूर्वी पुण्यात माझी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुढील सहा महिन्यातच रक्तवाहिनी बंद पडली. तीन महिन्यापूर्वी एन्जोप्लास्टीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉ. प्रमोद पवार यांच्याबद्दल मला माहिती कळल्यामुळे मी सोलापुरात येऊन शस्त्रक्रिया करून घेणे पसंत केले. आता माझी प्रकृती उत्तम आहे.: अनिल चव्हाण, रुग्ण, पुणे
What's Your Reaction?






