मालेगाव बॉम्बस्फोट...भगवा आतंकवाद आणि काँग्रेसचा जिहादी कट...फेक नॅरेटिव्ह! सोनियाजी,राहुलजी,सुशीलकुमार शिंदे,शरद पवार, चिदंबरम्, दिग्विजयसिंग देशाची माफी मागणार का?
मालेगाव बॉम्बस्फोट...भगवा आतंकवाद आणि काँग्रेसचा जिहादी कट...फेक नॅरेटिव्ह! सोनियाजी,राहुलजी,सुशीलकुमार शिंदे,शरद पवार, चिदंबरम्, दिग्विजयसिंग देशाची माफी मागणार का?

(विजयकुमार पिसे)
29 सप्टेंबर 2008 मध्ये मालेगावच्या मशिदीत बॉम्बस्फोटमधील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहितसह सर्व सातजण निर्दोष सुटले. हा बॉम्बस्फोट भगवा आतंकवादने घडविला असे विधान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तसेच त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी संसदेत ऑपरेशन सिंधूरला "तमाशा" असे संबोधले. म्हणजे मतपेढीसाठी काँग्रेसी विचाराचा हा जिहादी कट होय. त्यांच्या या फेक नॅरेटिव्हवर न्यायालयाच्या निकालाने तमाचा मारला आहे. त्यामुळे सोनियाजी, राहुलजी,सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आदी काँग्रेसी देशाची माफी मागणार का? आजच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सत्य स्पष्ट झालं असून, हिंदू धर्म आणि समाजाला दहशतवादाशी जोडण्याचा काँग्रेसी कट उघड झाला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट घडला या दरम्यान अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात शरद पवार म्हणाले होते, कुठेही स्फोट वा घातपात झाल्यावर एकाच धर्माचे लोक पकडले जातात. दुसर्या कुणाकडे संशयाने बघितले जात नाही. ही बाब गंभीर आहे. पवारांच्या या विधानानंतर बॉम्बस्फोट तपासाची दिशाच बदलून गेली होती. संशयित म्हणून दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने आधी मुस्लिम तरुणांना पकडले होते. पवार यांच्या विधानानंतर नवे (तत्कालिन) एटीएस प्रमुख हेमंत करकरेे यांनी नव्या दिशेने तपास सुरू केला. त्यात त्यांना मालेगावात हिंदू दहशतवाद्यांनी घातपात केल्याचा शोध लागला. त्यानुसार धरपकड झाली. पवार साहेब असेही म्हणाले होते की, शुक्रवारी मुस्लिमांचा पवित्र दिवस असतो, अशा वेळी कोणी मुस्लिम घातपात अथवा हिंसाचार करणार नाहीत. अर्थात एटीएसचा तपास पवारांच्या आकलनाप्रमाणे झाला,असे म्हणता येईल. त्यांचे शिष्योत्तम देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही पुढे काँग्रेसच्या शिबिरात भगवा (हिंदू)दहशतवाद म्हणून री ओढली. त्यांचेही आकलन तेच होते. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये भगवा दहशतवाद म्हणून भुई थोपटण्याचे काम झाले, हा मुस्लिम मतपेढीसाठी काँग्रेसचा जिहादी कट होय.
"तमाशा" या शब्दाकडे लक्ष वेधण्याचे आणखी एक कारण म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रक़रणाला हिंदू दहशतवाद ठरवण्याचा जो तमाशा झाला. तसेच सुशीलकन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पहगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूरचा उल्लेख "तमाशा" म्हणून केला. म्हणजे काँग्रेसी विचारसरणी दर पिढी बदलली नाही. पवार काका जे म्हणाले, तेच सुशीलकुमार शिंदे बोलले. त्यानंतरची पिढी प्रणितीताई यांनी त्यावर तमाशा केला. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल. पहलगाम आणि ऑपरेशन सिंधूरवर संसदेत काँग्र्रेसने चर्चेची मागणी केली. त्यात डोनाल्ड ट्रंप आणि पाक पुरस्कृत दहशतवादाला काँग्रेसची पूरक विधाने यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो तमाचा मारला. तरीही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असे म्हणतात. स्व.नेहरूजी, इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी आणि या पक्षाचे तमाम नेते खरगे, दिग्विजयसिंग, शरद पवार, सुशीलकुमार आणि कन्या प्रणिती शिंदे ही मंडळी मतपेढीसाठी जिहादी तत्वाचा विचार मांडतात असे वाटणे साहजिक आहे.
भारतात हिंदू दहशतवाद फोफावतोय, इस्लामी जिहादींपेक्षा हिंदू दहशतवादाचा मोठा धोका आहे, असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूतांशी बोलताना केले होते. त्यामुळे त्या आधारे मालेगाव बॉम्बस्फोटात पुरावे शोधले गेले. हिंदू दहशतवाद ही सेक्युलर भाषा रूढ झाली. काँग्रेसच्या यूपीए सरकारच्या काळात हेच धोरण होते. या सर्व प्रक़ारचा पर्दाफाश न्यायालयात झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट निकालाने तो अधोरेखित केला आहे. त्यामुळे भगवा आतंकवाद म्हणणारे सुशीलकुमार आणि काँग्रेसी हिंदूंची माफी मागणार का?
एकूणच मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा तपास भरकटलेलाच होता, हे न्यायालयातही सिध्द झाले. मुंबई लोकल रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यातही सर्व आरोपींना हायकोर्टाने गेल्या आठवड्यात खालच्या कोर्टातील शिक्षा रद्द ठरवून निर्दोष ठरवले. राजकीय नेत्यांची सोयीस्कर विधाने, त्यांच्या फेक नॅरेटिव्हची तळी उचलणारी माध्यमं. सरकारची मॅनेज्ड तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होतात.
What's Your Reaction?






