पु.अहिल्यादेवी जयंतीनिमित्त पूर्णाकृती मूर्तींचे वितरण
बेलभंडार चरित्रही भेट देणार, नरेंद्र काळे यांचा उपक्रम: महसूलमंत्री बावनकुळे, आ.पडळकर, खा. विकास महात्मे यांची उपस्थिती

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा ३० उत्सव मंडळांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वितरण गुरुवारी २९ रोजी दुपारी १२.३० वाजता सेवासदन प्रशालेजवळील ड्रीम पॅलेस येथे होणार आहे, अशी माहिती भाजपा माजी शहराध्यक्ष आणि संयोजक नरेंद्र काळे यांनी दिली.
महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते, आ. गोपीचंद पडळकर, पद्मश्री डॉ. खा. विकास महात्मे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जयंती उत्सव मंडळांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्तींचे वाटपाचे आयोजन केल्याचे संयोजक नरेंद्र काळे म्हणाले. तसेच ३०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रमही होणार आहेत. मूर्तीसाठी जयंती उत्सव मंडळांनी वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात मूर्ती वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेस प्रा. देवेंद्र मदने, प्रा. सिद्धेश्वर बेडगनूर, राजकुमार पाटील, संजय कणके, जयंती उत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष उमेश कोळेकर, राम वाकसे, सुनील खटके, विनोद मोटे, राज बंडगर, अमर दुधाळ, सुरेश सुलतानपुरे, अभिषेक भाईकट्टी, संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
*पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळांना मूर्तींसोबत बेलभंडार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्रही भेट देण्यात येणार आहे, हा अनोखा उपक्रम आहे.
What's Your Reaction?






