संसदेत पप्पूगिरी, सनातन धर्म, प्रभू श्रीराम,संत महंतांची चेष्टा

बहुरूपी खा.पप्पू यादव अन् काँग्रेसी पप्पूजींची त्यावर कडी

Aug 1, 2026 - 12:03
 0  55
संसदेत पप्पूगिरी, सनातन धर्म, प्रभू श्रीराम,संत महंतांची चेष्टा

(विजयकुमार पिसे)

नवी दिल्ली : राम मंदिरातील कथित चढावा चोरी आणि सीजेपीच्या जंतर मंतर आंदोलनामुळे विरोधकांना उसने अवसान आले आहे. सनातन हिंदू धर्म, परंपरा,रितीरिवाज आणि श्रध्देची यथेच्छ खिल्ली उडवण्याची चेष्टा सुरू केली आहे. असाच निंदनीय आणि संतापजनक प्रकार आज संसद भवन परिसरात काँग्रेस व स.पा. खासदारांनी केला.

बिहारमधील अपक्ष खा.पप्पू यादव यांनी भगवे वस्त्र परिधान करून हातात श्रीरामाचे छायाचित्र आणि दानपेटी घेऊन प्रतीकात्मक आंदोलन केले. संसद भवन परिसरात आज घडलेल्या संतापजनक घटनेत खा.राहुल गांधी देखील सहभागी होते. काँग्रेसी पप्पूजीनी खासदार पप्पू यादवांचे दर्शन घेत दानपेटीत रक्कम टाकली. अन्य खासदारांनीही समर्थन म्हणून दान पेटीत रक्कम जमा केली. हे पैसे खिशात ठेवून नंतर या दानपेटीसह पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी खा.पप्पू यादव यांना पकडले. 

या प्रतीकात्मक आंदोलनात काँग्रेस आणि स.पा.चे अखिलेश यादवांची पत्नी खा.डिंपल यादव, अयोध्येतील खा.अवधेश प्रसाद, प्रियांका गांधी व अन्य सदस्य देखील आघाडीवर होते. या चेष्टेखोर उपहासात्मक प्रकारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून हिंदूंच्या श्रध्देची संसद भवन परिसरात जबाबदार लोकप्रतिनिधींकडून खिल्ली उडवली जातेय, याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

   राम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन असले तरी सनातनी परंपरांचा अवमान करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू लपलेला नाही. बिहारच्या पप्पूनी यापूर्वी २८ जुलै रोजी, डोक्यावर पट्टी बांधून आणि हातात काठी घेऊन, एका जखमी व्यक्तीचे रूप धारण करत संसदेत लक्ष वेधून घेतले होतेे. त्यावेळी नीट परीक्षा पेपरफुटीचा वाद सुरू होता. 

दरम्यान लोकसभेत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. भाजपा सदस्यांनी या आंदोलनाला आक्षेप घेत कारवाईची मागणी केली. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या प्रतीकात्मक आंदोलनाची निर्भत्सना करून संसद आणि ज्या मतदारांनी बहुमतांनी निवडून दिले, त्यांचे पावित्र्य आणि गरिमा राखा असा सल्ला दिला. तसेच या घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले. 

    

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow