चाय पे चर्चा : तिकडे पूर, इकडे असमाधान..
राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरांत नागरिकांना शासकीय सेवा एका छताखाली मिळत असताना, काही ठिकाणी मानपान आणि व्यासपीठावरील स्थानावरून राजकीय नाराजीचे चित्र दिसून आले. मोहोळ आणि सोलापूर उत्तर मतदारसंघातील घडामोडींनी या शिबिरांची वेगळीच चर्चा रंगवली.
सारं का़ही एकाच छताखाली. शासकीय दाखले देण्याची राज्य सरकारची छ.शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीरं. विधानसभा मतदारसंघात ही शिबीरं भरिवली जात आहेत. या शिबिरातून शिवरायांच्या रयतेचं समाधान नक्की होतंय, पण राजकीय पुढार्यांचं असमाधान. काही मतदारसंघातील हालहवाल पाहिले तर अनेक नेत्यांचा मानपानावरून जळफळाट झाला. मोहोळ मतदारसंघात समाधान शिबीर ऐनवेळी रद्द झालं. ह्या तालुक्यात सरंजामी राजकारण. विद्यमान आ.राजू खरे शिबिरात आले, तेव्हा त्यांना कळालं रद्द. त्यांचा सवाल होता, हा शासकीय उपक्रम, राजकीय नव्हे. तरीही असं का? अनगरकर आल्या पावली परतले. मला पत्रिका बाय हॅण्ड मिळाली नाही., अशी त्यांची तक्रार. उठाठेवीनंतर कळालं भीमेला पूर आलाय, तेव्हा सरकारी यंत्रणा तिकडे गेलीय.
कानामागून आले अन्.. नवं भाजपायींची चर्चा. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात त्यांना मार्मिक उत्तर मिळालं. व्यासपीठावर अशा आगंतुकांचे चेहरेे पाहण्यालायक होते. या मतदारसंघात काँग्रेसींच्या काळात सरंजामी राजकारण होतं. सोलापूरच्या देशमुखांनी ह्या सरंजामी घराण्यांचा खालसा केला. असो.
आगंतुक आलेल्यांना 'स्टँडींग' खुर्च्या कोण देणार? मी पण भाषण करणार असा हेका म्हणे. मात्र तिथे डाळ शिजली नाही. अधिक़ारी म्हणाले, हा सरकारी कार्यक्रम, राजकीय नाही. आणि तुमच्या पक्षाचा तर मुळीच नाही. मग काय, तो तोरा. दोन दिवसांपूर्वी जे महापालिकेत घडलं. त्याचं *उत्तर इथेही मिळालं. समाधान शिबीर जनतेसाठी, नेते मात्र असमाधान. 'त्या' डिजीटल फलकावरील फोटोचा हा परिणाम नव्हे! आलं लक्षात...
What's Your Reaction?