चाय पे चर्चा : ये मेरा इंडिया..!
भारतीय हॉकी संघ आगामी स्पर्धांमध्ये नव्या भगव्या जर्सीत दिसणार आहे. शौर्य, संस्कृती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या या जर्सीत सुदर्शन चक्र, तिरंगा आणि देवनागरी शैलीतील 'INDIA' डिझाइनचा समावेश असून, खेळाडूंची मैदानावरील दृश्यमानता वाढवण्याचाही उद्देश आहे.
२९ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचा जादुगर मेजर ध्यानचंद यांची जयंती. राष्ट्रीय खेळ हॉकीत भारत नेहमीच अजिंक्य. आता या हॉकीत नवंरंग पाहायला मिळणार आहे, आगामी विश्व चषक हॉकीत 'यह मेरा इंडिया' भाव खाऊन जाणार नक्की. भगव्या रंगाच्या जर्सीत खेळाडू दिसतील. यात केवळ रंगच नव्हे तर अन्य बदलही आहेत. ज्याची सोशल मीडिया आणि क्रीडा जगतात उत्सुकतेने चर्चा होत आहे.
नवीन डिझाईन आणि रंगसंगती पाहिली तर अनेक बाबी लक्षात येतील. पहिलं म्हणजे भगवा रंग म्हणजे शौर्य, त्याग आणि विजयाचं प्रतीक. उगवत्या सूर्याचाही रंग भगवा. ती प्रेरणा यामागे आहे. नव्या जर्सीच्या मध्यभागी एक डिझाईन असून ते भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब होय. मानेकडे आणि हाताच्या बाहीवर निळ्या रंगाची (नेव्ही ब्लू) एक पातळ पट्टी आहे, ती प्रगती, शांती आणि एकाग्रतेचा संदेश देते. अशोक चक्रापासून हे प्रेरित आहे. जर्सीच्या मध्यभागी ग्राफिक्समध्ये सुदर्शन चक्राचं आधुनिक रूप प्रकटलं आहे. सामर्थ्य, एकता आणि गतीचं हे प्रतीक. गळ्यापासून खांद्यापर्यंत तिरंग्याची पट्टी आहे, हा राष्ट्रीय अभिमान. आणि मध्यभागी इंग्रजीत 'इंडिया' दिसतो. त्याचे वळण देवनागरी लिपीप्रमाणे. येथे भाषिक आणि सांस्कृतिक विविधता दर्शवते.
आता हा बदल का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.तांत्रिकदृष्ट्या हे लक्षात घेतलं पाहिजे की, निळी जर्सी अनेकदा निळ्या सिंथेटिक टर्फच्या रंगामध्ये मिसळून जायची. तो रंग आता आंतरराष्ट्रीय हॉकी मैदानांसाठी मानक रंग आहे. याचा परिणाम खेळाडूंना मैदानातील स्पष्टता आणि दृश्यमानतेवर होत असे. यामुळे खेळाडूंना मैदानावर गोष्टी स्पष्टपणे पाहण्यात आणि ओळखण्यात अडचणी यायच्या. त्यामुळे भारतीय संघाचा 'यह मेरा इंडिया' मैदानावर नक्की भाव खाणार!
What's Your Reaction?