संघाचा मूलाधार केशवम् स्मरामि सदा

उरला संघरूप, संघराष्ट्र रूप उरो। विजयिष्णु विभवपूर्ण हिंदुराष्ट्र सार्थ ठरो। हिंदूंचा विजयघोष त्रिभुवन व्यापुनि उरो॥

Mar 30, 2025 - 00:08
Mar 30, 2025 - 00:49
 0  273
संघाचा मूलाधार केशवम् स्मरामि सदा

2025 रा.स्व.संघाचे शताब्दी वर्ष. या शतकात राष्ट्रव्यापी संघकार्य विस्तारले आहे. त्यामुळे   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्राचा उध्दारक मार्ग खरा. पण तो कोठे पहावयास मिळाला असेल तर तो परमपूजनीय डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वात. याविषयी पूजनीय श्री गुरुजींनी व्यक्त केलेल्या भावना याप्रमाणे.... संघाचा मूलाधार काय, असा जेव्हा प्रश्‍न पडतो, तेव्हा संघाचा मूलाधार म्हणजे डॉ. हेडगेवार, असे नि:संदिग्ध सांगता येते.  
राष्ट्रातील तरुण वर्ग हेच राष्ट्राचे खरे चैतन्य. हा तरुण नुसता वयाने नव्हे तर शरीर, मन, काया या तीनही ठिकाणी त्याचे मुसमुसणारे जिवंत तारुण्य तेजस्वी, पराक्रमशाली नि प्रसन्नतेने ओत:प्रोत भरलेले आहे, ते दिसले पाहिजे. तरुणांनीच महान साम्राज्ये निर्माण केली पाहिजेत. श्री शिवछत्रपतींचे हिंदूंचे साम्राज्य स्थापणारे वीर कोण होते? हिंदू तरुणच ना? स्वत: संस्थापक प्रणेता तरुण तसेच अनुयायीही तरुण. हिंदुराष्ट्राचा इतिहास पहा। सर्वत्र हीच गोष्ट दिसून येईल, की राष्ट्रातील तरुण हीच राष्ट्राची खरी संपत्ती. हेच वैभव नि आशास्थान.  
हिंदू तरुणांनो। तुमच्या कर्तृत्वाकडे                                                                                                                              
तुमच्या मातेचे डोळे एकसारखे लागले आहेत॥।
सामर्थ्य आहे हिंदुत्वाचे, प्रत्येक हिंदुराष्ट्रीयाचे।
परंतु तेथे संघटनेचे, अधिष्ठान पाहिजे॥ तरच..
   संघटनेमुळे कार्यशक्ती वाढते. आपल्यातील विरोध वृत्ती नाहीशी होउन बंधूभाव उत्पन्न होतो व राष्ट्राची एकसारखी सवार्र्ंगीण उन्नती होत राहते. संघटनेमुळे व्यक्तीचीही उन्नती होते. व्यक्तीस्वातंत्र्य व समाजसंघटना यांचा योग्य तो संगम झाल्यानेच राष्ट्रकार्य यशस्वी होते. संघटनेचे महात्म्य इतके मोठे आहे की राष्ट्रातील कोणत्याही कार्याची यशस्वीता संघटनेत साठवलेली असते. म्हणूनच हिंदुस्थानातील आसेतु हिमाचल अशी अखिल हिंदूंची एकजिनसी नि अभेद्य संघटना करणे हाच आपला सध्याचा धर्म आहे. त्याकरता आपण जिवंत  अशी माणसे तयार केली पाहिजेत. जागोजागी संघटना, मंडळे स्थापन केली पाहिजेत. एकाचे एकवीस, पाचाचे पंचेवीस, या प्रमाणे संघटनेच्या विचारांनी भारलेले तरुण सर्व हिंदुस्थानात पेरले पाहिजेत.
डॉ. हेडगेवार यांनी मार्च 1928 मध्ये सर्वप्रथम निवडक 99 स्वयंसेवकांना ही प्रतिज्ञा दिली.
मी, सर्वशक्तीमान श्री परमेश्‍वराला व आपल्या पूर्वजांना स्मरून प्रतिज्ञा करितो की, मी आपल्या पवित्र हिंदूधर्म, हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे. संघाचे कार्य मी प्रामाणिकपणे नि:स्वार्थ बुध्दीने व तनमनधने करीन. व हे व्रत मी आजन्म पाळीन...
(स्वातंत्र्यापूर्वी या प्रतिज्ञेत हिंदुराष्ट्राला स्वतंत्र करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे, असा उल्लेख होता.)
॥जय बजरंग बली हनुमान की जय॥
डॉ.हेडगेवार यांनी तरुणांची अंत:करणे संघाकडे आकर्षूण घेतली. त्यांनी आपल्यात त्यागाची प्रवृत्ती निर्माण केली. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदुत्वाची जाणीवही तरुणांच्या मनात निर्माण केली. संघाचा जो भगवा ध्वज आहे, तो हिंदू संस्कृती कायम ठेवून शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य प्राप्त केले, त्याचे द्योतक आहे. तशी लोकोत्तर संघटना डॉ.हेडगेवार यांनी निर्माण केली.
डॉ.हेडगेवार यांनी संघ स्थापन केला 1925 मध्ये. तेव्हा त्यांचे वय होते 36. एक तरुण बाल एकत्र करून शाखा सुरू करतो. हीच लहान मुले पुढे तरुण झाल्यानंतर संघकार्यासाठी झोकून देउन कार्य करतात. त्यांच्यासमोर आदर्श डॉ. हेडगेवार होय. डॉ.हेडगेवार यांचे देहावसान झाले, तेव्हा त्यांचे वय होते 51 आणि संघाची स्थापना होउन जेमतेम 15 वर्षे झाली होती. त्यानंतर गत 85 वर्षांत संघाचे विश्‍वव्यापी कार्य आपण पाहतो. बाल शाखेतील संस्कार आणि पुढे तरुणांचे संघटन उभे करून डॉ.हेडगेवार यांची किती दूरदृष्टी होती, हे लक्षात येईल. डॉ.हेडगेवार यांनी स्थापन केलेले संघकार्य आज शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. या काळातही संघ कामाची आवश्यकता आणि व्यापकता तितकीच आहे, ज्याकडे समस्त हिंदू समाज आश्‍वासकतेने पाहात आहे.
विजयकुमार पिसे (पत्रकार),
विभाग सहमंत्री विश्‍व हिंदू परिषद
पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow