आठवडा आहे खास.. आवडत्या नेत्यांचा वाढदिवस सप्ताह/पंधरवडा!

सुशीलकुमार शिंदे, आ.देवेंद्र कोठे, शिवानंद पाटील, विजया वड्डेपल्ली, महापौर विनायक कोंड्याल...

Sep 8, 2026 - 01:13
Sep 8, 2026 - 11:24
 0  152
आठवडा आहे खास.. आवडत्या नेत्यांचा वाढदिवस सप्ताह/पंधरवडा!

 (विजयकुमार पिसे)
वाढदिवस असतोच प्रत्येकाचा खास... प्रिय व्यक्ती, मित्र, गुरूजन असो वा नेता. ज्याचा त्याचा आयकॉन असतोच. १ जून सरकारी वाढदिवस. या दिवशी अनेक जण व्यस्त नोकरीतून रिटायर्ड होतात. तेव्हा वय असते ५८! एरवी वाढदिवस होतो, पण वय लपवलेलं असतं. नेत्याचा वाढदिवस कार्यकर्त्यांसाठी दिवाळी. साधू संत येती घरा... तोचि..; इतिहासातील एक सुविचार! लाडक्या नेत्याचा वाढदिवस याच परिभाषेत अधोरेखित होतो. असो..
   सप्टेंबर ग्रुप फेमस आहे. त्यामुळे आठवडा आहे खास.. या आठवड्यात सुशीलकुमार शिंदे, युवा आ.देवेंद्र कोठे, त्यांचे बंधू नगरसेवक प्रथमेश कोठे (८ सप्टेंबर), भाजपा नगरसेवक शिवानंद पाटील, महिला आघाडी अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला आहे. तर  महापौर विनायक कोंड्याल यांचा वाढदिवस गणपती आगमनाच्या दिवशी आहे.   
    सुशीलकुमार शिंदे अनेक वर्षे राज्यात अर्थमंत्री, केंद्रात  उर्जा आणि गृहमंत्री, लोकसभेचे नेते, राज्यपाल अशी मोठी धुरा त्यांनी वाहिली. ४ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस होता. शिंदेंच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख तात्या कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे आणि माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे आ.देवेंद्र कोठे यांचा आज वाढदिवस. मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोठे भाजपात आले, आणि नोव्हेंबरमध्ये मध्य मतदारसंघातून आमदार झाले. जी संधी तात्यांना आणि महेश अण्णा यांना काँग्रेसमधून मिळू शकली नाही, भाजपाच्या माध्यमातून देवेंद्र दादांच्या रूपातून कोठे परिवारात ही संधी लाभली. कोठे जेव्हा भाजपात दाखल झाले, तेव्हा राज्यात देवेंद्र (फडणवीस) आणि सोलापुरातही देवेंद्र (कोठे) ही "टॅग लाईन" *मी चालविली. त्याचे फलित लगेचच दिसले. 
    महेश कोठे यांचे सुपुत्र प्रथमेश कोठे जुने विडी घरकुलमधून  नगरसेवक झाले. अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे राजकीय  आणि सामाजिक कार्य सुरू आहे. यावेळी त्यांनीही भाजपातून आपली इनिंग सुरू केली. तेही युवक आहेत. होटगीकर शिवानंद पाटील  १९९७ पासून भाजपात सक्रिय म्हणजे त्यांच्या भागातून शशिकला बत्तुल, श्रीकांचना यन्नम यांना सातत्याने निवडून आणण्यात पुढाकार होता. २०१० च्या दशकात सोलापुरात ड्रेनेजलाईन गळतीमधून  दूषित पाणी पुरवठ्यामुळे अनेक जण दगावले. तेव्हाच्या त्या आंदोलनातून पाटलांचे संघर्षमय नेतृत्व पुढे आले. जनता पार्टीचे (१९७७) तत्कालिन आमदार गुरुनाथ पाटील हे शिवानंद पाटलांचे काका. आता त्यांची तिसरी टर्म असून मनपा सभागृहनेते पद त्यांनी गत टर्ममध्ये भूषविले होते. बृहन्मठ होटगी मठाचे विश्‍वस्त असून सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात.
    १९९७ मध्ये पूर्व भाग अशोक चौक काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून विजया वड्डेपल्ली प्रथमच निवडून आल्या. विडी कामगारांशी आणि प्रभागात नित्य संपर्क आणि काम हेच त्यांचे भांडवल. शिवाय महिला आघाडीचा चेहरा. त्यांना पक्षाने शहराध्यक्ष महिला आघाडी म्हणून संधी दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे खास तंत्र होते. सध्या त्यांच्याकडे प्रदेश सचिव अशी नवी जबाबदारी आली आहे. यंदा त्यांना मनपात संधी मिळाली नाही. पण डगमगल्या नाहीत, अलीकडेच त्या अमेरिकेत गेल्या आहेत. तिथेही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रिय राहिल्या आहेत. चळवळीतून आलेले कार्यकर्ते कुठेच स्वस्थ बसत नाहीत, त्याचे हे उदाहरण.
या सर्व युवा नेत्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष्यवेध परिवारतर्फे मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow