मानसी कांबळेचा राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मान
वस्त्र उद्योगातील बॅचलर डिग्री इन टेक्सटाइल डिझाईनचा अभ्यासक्रम, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे (NIFT) मुंबईत शिक्षण
सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील कुमारी मानसी महेश कांबळे हिस वस्त्रोद्योगातील बॅचलर डिग्री इन टेक्सटाइल डिझाईन अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील पदवीदान कार्यक्रमात सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुळातच सोलापूर टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. कुमारी मानसी हिचे आजोबा कै. मनोहर कांबळे हे देखील टेक्स्टाईल उद्योजक होते. आणि त्यांच्याच प्रेरणेतून वस्त्र उद्योगातील बॅचलर डिग्री इन टेक्सटाइल डिझाईन हा कोर्स करण्याचा तिने निर्णय घेतला. आणि योगायोगाने भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) मुंबई येथील महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला. तिचे माध्यमिक शिक्षण हिंदुस्तानी कॉन्व्हेन्ट चर्च हायस्कूल तर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स सोलापूर येथून झाले. शालेय जीवनापासून तिच्या अंगी असलेले नेतृत्व गुण, विस्तृत वाचनाची आवड, इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची तिची तीव्र इच्छा आणि तिच्या ठाई असलेली जिद्द यामुळे आपल्या शैक्षणिक प्रवासादरम्यान तिने स्टुडंट्स डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज कौन्सिल ( SDAC) मध्ये प्रथमतः सचिव त्यानंतर अध्यक्ष पदाची जबाबदारी सहजपणे पार पाडली.
त्यानंतर दोन वर्षे एका एनजीओमध्ये स्वयंसेविका म्हणून कार्यरत राहून अनेक समाजोपयोगी उपक्रमात तिचे योगदान राहिले आहे. तिच्या उल्लेखनीय कामगिरीत, स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात छखऋढ चे प्रतिनिधित्वही केले. आहे. मानसीने प्राप्त केलेल्या बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des.), अंतर्गत विशेष शाखा "Silk in Indian handicrafts" या विषयावर मानसी हीचे संशोधनपर लेख Springer Nature या आंतरराष्ट्रीय प्रकाशन कंपनीकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. अशा, बहुगुणी विद्यार्थिनीचे NIFT च्या दिल्ली येथील दीक्षांत समारंभात तिला "Extraordinary Service Award of the 2026 " म्हणून सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने नामांकन केले आहे. दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली. ही बाब समस्त सोलापूरवासीयांसाठी अभिमानाची आहे. तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि 11,000 रुपये रोख असे या सर्वोच्च पुरस्काराचे स्वरूप आहे.
What's Your Reaction?