सीतानवमी निमित्त पर्यावरण, प्रबोधन, स्त्री शक्तीचे जागरण

विहिंप मातृशक्ती, इको नेचर यांचा आगळा वेगळा उपक्रम

Apr 29, 2026 - 23:35
 0  4
सीतानवमी निमित्त पर्यावरण, प्रबोधन, स्त्री शक्तीचे जागरण

सोलापूर : सीतानवमी निमित्त पर्यावरण,प्रबोधनात्मक स्त्री जागरणाचा आगळा वेगळा उपक्रम विश्‍व हिंदू परिषद मातृशक्ती आयाम आणि इको नेचर यांच्यावतीने साजरा करण्यात आला. सोलापूरच्या उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण झाले. तसेच सर्व उपस्थित मातृशक्तींचा वृक्षरोप, पुस्तक आणि शाल देऊन त्यांनी सन्मान केला. 

   विजयपूर रोडवरील विवेकानंद नगरातील विघ्नहर्ता मंदिर परिसरात सीतानवमी निमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी विहिंपचे जिल्हाअध्यक्ष तथा उद्योजक विष्णू मोंढे, उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर,मातृशक्ती आयाम संयोजिका माधुरी एकबोटे, प्रा.वनिता मारा,डॉ.दीपा कुंभारे,अर्चना होळकर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांच्या प्रतिमेचे आणि पादुकांचे पूजन आणि रोपकुंडीत जलअर्पण करण्यात आले. विहिंपचे विभागमंत्री विजयकुमार पिसे यांनी सीता माता यांचे संपूर्ण जीवन पर्यावरणपूरक होते. तसेच त्यांची पवित्रता आजच्या समाजजीवनात अनुकरणीय आहे. त्याअनुषंगाने सीतानवमीचा कार्यक्रम केवळ प्रतिमापूजन आणि भाषण न करता प्रत्यक्ष कृतीशीलपणे करता येईल, ही भूमिका मांडली. त्यास अनुसरून इको नेचर वृक्षसंवर्धन तसेच वृक्षसंगोपन करणार्‍या संस्थेचे प्रमुख मनोज व महेश देवकर बंधूंनी सीतानवमीचा आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचा मनोदय करून नियोजन केले होते.

   मातृशक्तीच्या संयोजिका माधुरी एकबोटे यांनी प्रस्ताविक आणि स्वागत केले. विहिंप विभाग मंत्री विजयकुमार पिसे यांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा परिचय आणि समाजजीवनात त्यांचे योगदान याविषयी माहिती दिली. अध्यक्ष विष्णू मोेंढे यांनी सीतामातेचे जीवन आपली दैनंदिनी आणि समाजात अनुकरणीय आहे, ज्यामुळे देशाचे भले होईल. उपमहापौर ज्ञानेश्‍वरी देवकर यांनी, सीतामाता ही जनककन्या राजकुमारी, अयोध्यापती, लवकुश यांची माता म्हणून आदर्शवतच होती. सीता वनवासात सर्व प्राणीघटक,जीव जंतू आणि पर्यावरण अनुकूल समरस जीवन जगली. आज याची आवश्कता आहे, असे उपमहापौर देवकर यांनी सांगितले. प्रा.वनिता मारा यांनी सीता म्हणजे नेमकी कोण याची व्याख्या लक्षात आली तर सीतामातेचे महत्व समजेल. त्यामुळे सीतामाता नेहमीच अनुकरणीय आहे, असे सांगितले. डॉ.दीपा कुंभारे यांनी, सीतेचे संपूर्ण आयुष्य पर्यावरणाशी निगडित राहिले. पवित्रता जपली तर लव जिहादसारख्या घटनांना पायबंद बसेल, असे आवाहन केले. यावेळी अन्य उपस्थित मातृशक्ती, दुर्गावाहिनी यांनीही मनोगत व्यक्त केले. मातृशक्ती सहसंयोजिका वर्षा महिंद्रकर यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी विश्‍व हिंदू परिषद विभाग सहमंत्री संजय जमादार, समरसता आयाम प्रमुख चंद्रकांत कुलकणीॅ, भाजपा मंडल अध्यक्ष महेश देवकर, इको नेचरचे प्रमुख संयोजक मनोज देवकर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow