सज्जन नगरपिते
मनपा सभेतील शोकप्रस्तावानंतर भाजप नगरसेविकेचे आयुक्तांना पत्र; ‘प्रस्ताव तातडीने मागे घ्या’ची मागणी
15सप्टेंबरच्या महापालिका सर्वसाधारण सभेत, (जी पूर्वनियोजित तहकूबच होणार होती) दिल्ली शीख दंगलीमधील दोषसिध्द आरोपी काँग्रेस खासदार सज्जनकुमारला श्रध्दांजली वाहण्याचा धक्कादायक प्रकार घडला. मनपात भाजपाची सत्ता निरंकुश. पण पक्षीय विरोधाभास. कारण सज्जनकुमारच्या अंत्ययात्रेस, शोकसभेत आणि कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलेल्या भाजपाच्या तीन खासदारांचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतिन नबीन यांनी कान धरले, नोटीसही बजावली. लक्ष्यवेध न्यूजने सोलापूर मनपा सभेतील सज्जनकुमारच्या शोक प्रस्तावाचे वृत्त प्रकाशित केले. तेव्हा ही बाब लक्षात आली. चूक कोणाची यावरून मात्र सत्ताधारी भाजपात टोलवाटोलवी आहे. दरम्यान माध्यमांनाही हे कळून चुकले. त्यांनी यशावकाश त्या ठरावाचे वृत्त (शुक्र.18 रोजी) प्रकाशित केले.
लक्ष्यवेधचे वाचक सूज्ञ आहेत, एका स्वयंसेवकाची प्रतिक्रिया होती. सोलापूर महापालिकेचे मान्यवर नगरपिते फारच सज्जन निघालेले दिसतात. संघ स्वयंसेवक सजग असतात. भोवतालच्या घटनांविषयी सावध असतात. सत्तेत 'सुस्त' भाजपा, सध्या 'मस्त' आहे. त्यामुळे काही घडले, लक्षात आले, जनतेमधून प्रतिक्रिया आली.. तरीही...
दरम्यान भाजपाच्या युवा नगरसेविका तथा कामगार कल्याण समितीच्या सभापती सौ.श्रध्दा किरण पवार यांनी शुक्रवारी 18 रोजी तातडीने आयुक्तांना पत्र देऊन सज्जनकुमार विषयी शोक प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, रद्द करावा, अशी मागणी केली आहे.
भाजपाध्यक्षा मनपाच्याही सदस्या आहेत, तर काही नगरसेवक संघाशी संबंधित असल्याचे समजते. जी गोष्ट जेन झी नगरसेवक कार्यकर्त्यांना कळते. परंतु अभ्यासू म्हणून ज्यांना मनपात धाडले अशी जबाबदार मंडळी सोयीस्कर गप्प आहेत. अर्थात नगरपिते फारच सज्जन निघालेले दिसतात, संघ स्वयंसेवकांची अशी प्रतिक्रिया बिनचूक म्हणायची?
What's Your Reaction?