शहर मध्य पद्मशाली तेलुगू भाषिक विणकर समाजाला संधी
भाजपचे ४ आमदार जिंकणार, अन्यथा...

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : सोलापूर शहरातील शहर उत्तर आणि शहर मध्य तसेच दक्षिण सोलापूर मतदारसंघात तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली समाज निर्णायक आहे. शहर मध्य येथे या समाजाला भाजपाने उमेदवारी दिली तर चार आमदार सहज निवडून येईल. भाजपासाठी हा बोनस ठरणार आहे.
हा समाज १९९१ पासून नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला आहे. तसेच त्याच्या मुळाशी असलेले रा.स्व. संघाचे व्यापक कार्य. यामुळे या समाजात भाजपाविषयी आस्था आणि विश्वासाचे वातावरण आहे. 1995 -96 मध्ये सोलापूरचा पहिला खासदार तेलगू भाषिक निवडून आला. तत्पूर्वी 1991 मध्ये सोलापुरातून पहिला आमदार देखील भाजपाचा निवडून आला.(स्व.लिंंगराज वल्याल). ही पार्श्वभूमी लक्षात घेता १९९२ पासून आजतागायत या समाजाचे सर्वाधिक नगरसेवक भाजपाचेच आहेत. उत्तर व दक्षिण सोलापूर या ठिकाणचे दोन उमेदवार सातत्याने निवडून येतात. याचे कारण तेलगू भाषिक विणकर पद्मशाली समाज. तो भाजपाच्या पाठीशी असल्यामुळे शहर मध्य मतदारसंघात 2014 मध्ये युती तुटल्यानंतर आणि अपेक्षितपणे मोहिनी पतकी यांना उमेदवारी मिळाली. वास्तविक तेव्हाच तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाला संधी मिळणे अपेक्षित होते. तरी देखील मोहिनी पतकी यांना 26000 मते मिळाली. यामध्ये या समाजाचीच मते अधिक आहेत.
प्राप्त परिस्थितीत शहर मध्य मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे असे सांगितले जाते. त्यामुळे भाजपाचा दावा राहणार नाही. परंतु यामुळे तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाची संधी पुन्हा पुन्हा हिरावून घेतली जात आहे, हा समज दृढ झाला आहे. या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असला तरी त्यांच्याकडे उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण प्रत्येक निवडणुकीत त्यांचा उमेदवार उपरा असतो. बाहेरचा असतो. तेलुगू भाषिक नसतो. यामुळे लादलेला निवडून येऊ शकत नाही. तसेच तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर घसरलेला असतो. त्याची अनामत देखील जप्त झाली आहे. अशा स्थितीत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणे म्हणजे काँग्रेसला भेट देण्यासारखे होईल. किंवा एम.आय.एम.चा मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची भीती आहे.
लोकसभा निवडणुकीत देखील देखील भाजपाला सर्वाधिक मताधिक्य या समाजामुळेच मिळत आले आहे. प्राप्त परिस्थितीत शहर मध्य मतदारसंघ भाजपाला सोडणे आणि तेलगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाला संधी देणे हा चांगला पर्याय महायुतीसाठी लाभदायक ठरेल आणि निश्चितपणे निवडून येईल. तो भाजपाला बोनस ठरणार आहे. शिवाय शहर मध्य येथे तेलगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाला उमेदवारी दिल्यामुळे शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट या मतदार संघात जोडलेला गोदुताई विडी नवीन घरकुल येथील भाजपाच्या तीनही उमेदवारांना तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजाची निर्णायक मते मिळतील. जेणेकरून शहर मध्य मतदार संघ तेलुगू भाषिक पद्मशाली विणकर समाजामुळे १)शहर उत्तर, २)दक्षिण सोलापूर व ३)अक्कलकोट आणि एक जास्तीचा मतदारसंघ म्हणून ४) शहर मध्य या चार ही मतदार संघात कमळ फुलेल. त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी त्याची गंभीर दखल घेऊन तेलगू भाषिक विणकर समाजाला शहर मध्य मतदार संघाच्या रूपाने संधी देणे अपरिहार्य आहे.
*ही लढाई शेवटची....*
या उप्परही चालून आलेली संधी गमावू नये, अशी प्रामाणिक इच्छा आहे. अन्यथा आपली नेहमीच फसवणूक होते, हे लक्षात घेवून
बहुसंख्येने असलेला तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली मतदार कायमचाच भाजपापासून दुरावण्याची भीती आहे. गेल्या महिन्यात पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात खा. प्रणिती शिंदे यांनी या समाजावर टीका टीपणी करून काँग्रेसला (मला) मतदान केले नाही हे अधोरेखित केले. ही बाब गंभीरपणे भाजपाने लक्षात घ्यावी आणि हा मतदारसंघ भाजपासाठीच आहे हे गृहीत धरून तेलुगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाला संधी दिली पाहिजे. अशी स्थिती असताना मात्र न पेक्षा शिवसेनेला ही जागा देवू, अशी मानसिकता केली तर तेलगू भाषिक विणकर पद्मशाली समाजाचा विश्वासघात होईल आणि भाजपापासून कायमचा दुरावला जाईल. विशेष म्हणजे कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श) (स़ुशीलकुमार शिंदे व शरद पवार) यांच्या अनास्थेमुले समस्त तेलुगू भाषिक विणकर समाजाचा पर्यायाने पूर्व विभागाचा र्हास (नुकसान) झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. यापेक्षा अधिक सांगणे, न लगे एवढेच.
दोन महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून चाचपणी झाली. तेव्हा तेलुगू भाषिक विणकर समाजाचा विचार केला जावा, जो नेहमी भाजपानुकूल असतो. हे आम्ही व्यक्तीगतरित्या त्या शिष्टमंडलाकडे मांडले आहे. *(उत्तरार्ध)*
*काँग्रेसच्या अस्ताची (१९९५-९६) सुरुवात या तेलुगू भाषिक विणकर समाजानेच केली हे लक्षात घेतले तरी पुरे!*
(टीप : पूर्वार्ध : शहर मध्यचा कोथरुड पॅटर्न ही पोस्ट)
What's Your Reaction?






