स्वकुळसाळी समाजातर्फे 31 मे रोजी वधू,वर,पालक परिचय मेळावा

अध्यक्षपदी मोहन काजळे, सचिवपदी सचिन चिल्लाळ व अन्य पदाधिकारी एकमताने जाहीर

Mar 17, 2026 - 11:45
 0  33
स्वकुळसाळी समाजातर्फे 31 मे रोजी वधू,वर,पालक परिचय मेळावा

सोलापूर : श्री स्वकुळसाळी समाज सोलापूर आयोजित उप वधू वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पदाधिक़ार्‍यांची निवड एकमताने करण्यात आली.  अध्यक्षपदी श्री मोहन काजळे व सचिवपदी श्री सचिन चिल्लाळ यांची एकमताने निवड झाली. येत्या 31 मे रोजी एमआयडीसी भागातील महालक्ष्मी बॅक्वेट मंगल कार्यालय येथे स.11 वा हा मेळावा होईल,अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख नंदकुमार सपार यांनी दिली.
   उप वधूवर मेळाव्यासाठी अन्य पदाधिक़ारी याप्रमाणे.. उपाध्यक्ष:  लीलावती कल्याणी व उमा जिंदे, सहसचिव: गोवर्धन पिसे व  संतोष उकरंडे, कार्याध्यक्ष : दत्तात्रय राजकडे व सौ संगीता सपार, स्वागताध्यक्ष:  सौ रोहिणी सुरे, स्वागत समिती:  सौ शिल्पा राजकडे, सौ मयुरी कोंगे, सौ सुप्रिया सरवदे, सौ सुजाता सरवदे श्री गुंडेराव चिल्लाळ,  प्रसिद्धी प्रमुख- श्री नंदूदादा सपार, स्मरणिका प्रमुख- श्री निशांत पोरे.
   कार्यकारिणी सदस्य : सौ जयश्री सपार, सौ अनुराधा काजळे, श्री मनोज चिल्लाळ, श्री संतोष सुपे, श्री स्वप्निल एकबोटे, श्री ओमप्रकाश जिंदे, श्री गिरीश गुळेद, श्री राजेंद्र शेंद्रे, श्री प्रकाश साखरे, डॉ मल्लेश्‍वर येडके, श्री वेणूगोपाल दिवटे, श्री गणेश कोंगे. या सर्व पदाधिकारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  उप वधूवर व पालक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी या बैठकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष परमेश्‍वर गदगे व सचिव अ‍ॅड ज्ञानेश्‍वर डिंगणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow