महिला दिनानिमित्त पोलीस बॉईज असोसिएशनकडून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान

डॉ. अश्विनी पाटील, वैष्णवी पाटील यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव

Mar 17, 2026 - 11:49
 0  76
महिला दिनानिमित्त पोलीस बॉईज असोसिएशनकडून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान

सोलापूर | प्रतिनिधी

पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्तालय येथे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) डॉ. अश्विनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील तसेच पोलीस कर्मचारी गवळी मॅडम यांचा शाल, नॅपकिन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सत्कार प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी जिल्हाध्यक्ष संध्या काळे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना बेडगनूर, संगिता जाधव, शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, शहर उपाध्यक्ष राजश्री पाटील, शोभा बोबे, विधी आघाडी शहराध्यक्ष अॅड. अनुराधा येगडे, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रांजली हिंगे तसेच शिक्षक आघाडी शहराध्यक्ष राजश्री तडकासे आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस बॉईज असोसिएशन ही संघटना पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. संस्थापक रविभाऊ वैद्य, प्रदेश संघटक सुसर भाऊ तसेच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विजयाताई बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow