देशभरात संघाच्या ५८२० शाखा वाढल्या
संघाची हरियाणात अ.भा.प्रतिनिधी सभा बैठक
रा.स्व.संघाची अ.भा.प्रतिनिधी सभा बैठक हरयाणातील समालखा येथे आजपासून सुरू झाली असून पू.सरसंघचालक मा. डॉ.भागवत व सरकार्यवाह मा. दत्तात्रेय होसबळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी देशभरात संघाच्या शाखांमध्ये ५८२० इतकी लक्षणीय वाढ झाली, अशी माहिती सांगण्यात आली. तत्पूर्वी प्रारंभी दिवंगत मान्यवर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. देशातून ९४८७ प्रतिनिधी अ.भा. प्रतिनिधी सभेच्या बैठकीस उपस्थित आहेत.
What's Your Reaction?