स्वच्छ एमआयडीसी; सुंदर एमआयडीसी उपक्रम
पाणपोईचा शुभारंभ : महापौर कोंड्याल, नगरसेवक दायमा यांची संकल्पना
सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील कारखानदार व उद्योजकांच्या आयोजित सत्कार समारंभात स्वच्छ एमआयडीसी, सुंदर एमआयडीसी उपक्रम व पाणपोईचा शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पार पडला. स्वीकृत नगरसेवक तथा भाजप उपाध्यक्ष उद्योजक श्रीनिवास रा. दायमा संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.
याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर,सभापती रंजिता चकोते तसेच उद्योजक तिलोकचंद कासवा, पेंटप्पा गड्डम (अध्यक्ष,यंत्रमाग धारक संघ) चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, संजय साळुंखे, निलेश पोफलीया, अंबादास बिंगी, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेवक अक्षय अंजीखाने,प्रमोद दरगड, नितीन करवा,संगीता दायमा, कृष्णा दायमा उपस्थित होते. यावेळी महापौर कोंड्याल यांनी, पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी एमआयडीसी परिसरासाठी 4 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात येईल,असे सांगितले. याप्रसंगी एमआयडीसी परिसरातील कारखानदार व उद्योजकांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. परिसरातील उद्योजक, कारखानदार व नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दायमा यांच्या संकल्पनेचे सर्वानी कौतुक केले.
What's Your Reaction?