रामनवमी मध्यवर्ती अध्यक्षपदी डॉ.सूर्यप्रकाश कोठे

यंदा रामनवमीत ५१ उत्सवमूर्ती वितरण सोहळा

Mar 11, 2026 - 23:26
 0  2
रामनवमी मध्यवर्ती अध्यक्षपदी डॉ.सूर्यप्रकाश कोठे

सोलापूर : श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समितीची बैठक सुधीर बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरातील प्रथितयश डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

    जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.प्रदीपसिंग राजपूत,नगरसेवक बिज्जू प्रधाने, रवि बंडे,अ‍ॅड.दत्ता पवार, मदन मोरे, मराठा महासंघाचे दास शेळके, नगरसेवक शिवराज गायकवाड,रवी कोटमळे, सागर मोरे, राजाभाऊ निकम उपस्थित होते.

    अन्य पदाधिकारी देखील बिनविरोध निवड करण्यात आले. उत्सव अध्यक्ष : डॉ सुर्यप्रकाश कोठे,उपाध्यक्ष: हरी जाधव,रोहन मराठे,समर्थ नावडे, कार्याध्यक्ष: जितेश मासे,सहकार्याध्यक्ष : जयसिंग कैयावाले, सचिव: निशांत साबळे, सहसचिव: दिनेश चाबुकस्वार,प्रसिद्धी प्रमुख मडगे, विनोद गायकवाड, खजिनदार :प्रवीण गलांडे, सेक्रेटरी: शुभम कराळे, प्रसिद्धीप्रमुख: रोहित माशाळकर, आदित्य फडतरे.

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम भक्तांसाठी डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्यावतीने 51 श्रीरामांच्या मूर्ती उत्सव मंडळाना देण्यात येणार आहेत .

जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत  श्रीरामभक्त रवी कोटमळे यांनी मनोगत व्यक्त केले. यंदा श्रीराम नवमी उत्सव अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रस्तावना यतीराज होनमाने यांनी केली,.

मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष: सुधीर बहिरवाडे उपाध्यक्ष:संजय साळुंके, सचिव: समर्थ बंडे, खजिनदार: संदीप जाधव, सहसचिव:शिवराज गायकवाड, सल्लागार:अमित राऊत सदस्य:प्रसाद झेडंगे, प्रशांत पवार, संस्कार नरोटे,अर्जुन मोहिते,सुरज भोसले,लतेश हिरवे, कृष्णा जाधव,रुपेश बेलेराव, सुमित कोष्टी, सुहास चव्हाण यांची निवड करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow