प्र.26 रत्नमंजिरी नगरात रस्ते काम सुरु
माजी नगरसेविका राजश्री चव्हाणांचे प्रयत्न
सोलापूर : प्र.क्र.26 मधील रत्नमंजिरी नगरात गेली 20 वर्षे मनपाकडून कोणतीच सुविधा नाहीत. हैराण झालेल्या रहिवाशांनी नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर समस्यांचे निवेदन दिले होते. तेव्हा राजश्रीताईंनी प्रथम पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, दिवाबत्तीची सोय करून दिली. रस्ते कामासाठी शासन दरबारी, पालकमंत्री चंद्रकांत दादा, विखे पाटील व गोरे साहेब व आ.सुभाषबापूंना निवेदन दिले. पाठपुरावाही केला. अखेर नगरोस्थानमध्ये सदर रस्त्याला मंजुरी मिळाली व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या रस्त्यामुळे हेरिटेज फॉर्म, शिक्षक सोसायटी, गुरुदेव दत्त नगर भाग 2 ते 6, रोहिणी नगर भाग 1 ते 3, ओम गर्जना चौकातील नागरिक व विद्यार्थ्यांना खाी कॉलेज, डी मार्ट, आसरा चौक, येथे जा,ये सोयीचे झाले आहे. त्यामुळे रहिवासी समाधानी आहेत. सदर नगरात 20 ते 25 वर्षापासून वास्तव्यास असून शंभर टक्के मनपाला टॅक्स भरत आहोत. परंतु कोणतीच सुविधा नसल्यामुळे त्रास सहन करावा लागला.
तीन वर्षापूर्वी या नगरात मयत झाले होते, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मयताची तिरडी ठेवण्यासाठीही जागा नव्हती. सर्वत्र चिखल झाला होता. ही बाब जाणकार नागरिक आशिष परदेशी यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना हे निदर्शनास आणून दिले. तात्काळ तेथे मुरूम व रोलिंग करून दिले. तसेच पाईपलाईन,ड्रेनेज लाईन व दिवाबत्ती सोय केली आहे. आता आमचा वनवास संपलेला आहे, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी आशिष परदेशी, प्रतीक मोसलगी, सागर साळुंखे, प्रज्वल मायनोळ, मयूर गायकवाड, दानिश सय्यद, रामचंद्र भोसले, नीलकंठ सुसलादी, अनिल मोसंलगी, सागर साळवे, अरुण गवळी आदींनी सदर कामाबद्दल आभार व समाधान व्यक्त केले.
What's Your Reaction?