दीपोत्सवातून मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना, महाआरती!

पंढरीत तुळशी अर्चना पूजन; आजोबा गणपतीसमोर महाआरती, आशीवार्दाचे 101 दिवे, सेवासंकल्प, रांगोळी, प्र.12 मध्ये रक्तदान शिबीर

Sep 18, 2026 - 12:23
 0  3
दीपोत्सवातून मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना, महाआरती!

(विजयकुमागर पिसे)
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या 76 वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी पंढरपुरात जिल्हा भाजपाच्या वतीने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी अर्चना करण्यात आली. तसेच सोलापुरात सर्वत्र "आशीवार्दाचा दिवा" उपक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला. तरुण कार्यकर्ते, नेतेमंडळी व महिलांनी देखील मोदींच्या दीर्घायुष्यासाठी सुयश चिंतले.  सोलापुरात आजोबा गणपतीसमोर महाआरती झाली.  तसेच रक्तदान शिबीरही पार पडले.


   राष्ट्र प्रथम या भावनेने 25 वर्ष देशाची अखंड सेवा केल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत पंढरीत विठुरायासमोर तुळशी अर्चना झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, माजी आ. प्रशांत परिचारक, राजेंद्र  सुरवसे, भागवत बडवे, नगरसेवक सौरभ थिटे, युवा मोर्चाचे सुदर्शन यादव, लक्ष्मण शिरसट, अर्बन बँकेचे सतीश मुळे, मनोज सुरवसे, युवा मोर्चाचे सरचिटणीस अनुप देवधर, अजित लेंडवे व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   


   शहर मध्य : सोलापुरात शहर मध्य मतदार संघात पद्मनगर व एकता नगरात 101 दिव्यांचा आशीर्वादाचा दिवा कार्यक्रम पार पडला. प्र.46,47 येथे हा आगळा वेगळा कार्यक्रम झाला. यावेळी महिलांनी  रांगोळी काढून त्यामध्ये 101 दिवे प्रज्वलित केले. मोदीजींना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 'एक दीप, सेवासंकल्प' माध्यमातून  विकसित भारतचा संकल्प दृढ केला. या उपक्रमाचे आयोजन  बजरंग कुलकर्णी, (शहर चिटणीस) यांनी केले होते.


   प्र.12 सुनील नगरात जय भवानी मित्र मंडळाचेवतीने  रक्तदान शिबीर पार पडले. महापौर विनायक कोेंड्याल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. 'रक्तदान, श्रेष्ठ दान' या संकल्पनेतून शिबीर पार पडल्याबद्दल महापौर कोंड्याल यांनी रक्तदात्यांना प्रमाण पत्रे देऊन सन्मानित केले.
   महाआरती : मानाचा आजोबा गणपतीसमोर सकाळी महाआरतीचे आयोजन केले होते. आ. विजयकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. यावेळी उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow