चौफेर नरेंद्र मोदींचा आता चौकार!
सुशासनाचा रौप्य महोत्सव; सलग २५ वर्षं सत्ताकारणाचा नवा इतिहास, आज ७६ व्या वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा!!
(विजयकुमार पिसे, विभागमंत्री विहिंप)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज १७ सप्टेंबर रोजी ७६ वा वाढदिवस. त्यांच्या सुशासनाचाही रौप्य महोत्सव. २०२९ मध्ये मोदी जी चौकार मारण्यास सज्ज होतील.
गेली २५ वर्षं गुजरातचे मुख्यमंत्री ते विद्यमान प्रधानमंत्री चौफेर राज्यशकट चालवत आहेत. नॉनस्टॉप न थकता. दररोज १८ तास व्यस्त. असे व्यक्तिमत्व आम्हा भारतीयांना लाभले, याचा १४० कोटी भारतीयांना निश्चितच अभिमान आणि गौरवही.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव निमित्त त्यांनी २०४७ (शताब्दी) पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य मांडले आहे. प्रधानमंत्री मोदींचा विक्रम आणि संकल्प अभिनंदनीय असून *लक्ष्यवेध न्यूज परिवाराचे वतीने मा. मोदी यांना शतायुषी शुभेच्छा!
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी आता 'सप्तधारा'च्या माध्यमातून झेप घेण्याच्या तयारीत आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तरुण अर्थात Gen-Z, शेतकरी आणि महिलांकडूनही त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळंच Gen-Z साठी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून त्यांनी मोफत ऑनलाइन कोचिंगपासून AI ट्रेनिंग पर्यंतच्या घोषणाही केल्या आहेत. मुख्यमंत्री ते पंतप्रधान सर्वाधिक काळ प्रशासनाच्या शीर्षस्थानी राहण्याचा विक्रमच नव्हे, तर सर्वाधिक वेळा राष्ट्रध्वज फडकावण्याचा विक्रमही त्यांनी देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केला, याचा आम्हास अभिमान आहे.
आज ७६ व्या वाढदिवसा निमित्त मा.मोदी यांना शुभेच्छा देत असतानाच आपल्या प्रशासकीय कारकिर्दीचाही रौप्यमहोत्सव साजरा करणार आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी मा. मोदी प्रशासनाच्या शीर्षस्थानी राहात २५वर्षे पूर्ण करतील.
७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनलेले मोदी जनसमर्थनामुळे मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी आपली प्रशासकीय वाटचाल अखंडपणे सुरू ठेवली आहे. याशिवाय त्यांनी केलेला संकल्प आणि सिध्दी, अर्थात रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर करणेची परंपरा स्वागतार्ह आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी जनतेला आपला हिशोब देणे आणि शासनाची दिशा व उद्दिष्टे निश्चित करणे व ती कृतीत आणताना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ देणेची अंत्योदय योजना आज सर्वच लोकप्रतिनिधींनी अंगीकारली आहे. ही मोठी उपलब्धी २५ वर्षांच्या सत्ता प्रवासातून लक्षात राहिली आहे.
७ऑक्टोबर २००२ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारलेल्या मोदींना शासनप्रमुख म्हणून मोदींसाठी तो आव्हानांचा काळ होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा घटनेत ५९ कारसेवकांना जाळून मारण्यात आल्याच्या घटनेनंतर गुजरातेत दंगली उसळल्या. विरोधकही आक्रमक होते. त्यामुळे मोदी यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेत १९ जुलै २००२ रोजी गुजरात विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. तसेच लवकर निवडणुका घेण्याची मागणीही केली.
पुढे मोदी यांनी सुशासनावर भर देत म.गांधी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवलेल्या भारतात सुराज्यनंतर सुशासनही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आग्रहाने मांडले. मा. मोदी यांच्या कारभाराचा हाच मूलमंत्र ठरला. हा मूलमंत्र गुजरात मॉडेल म्हणून विकसित झाला. देशभरात त्याची चर्चा झाली. जनतेच्या मनात आदराचे, विश्वासाचे स्थान निर्माण झाले. ही उपलब्धी मे २०१४ मध्ये दिसली. मा.नरेंद्र जी मोदी देशाचे पंतप्रधान झाले. सलग १३ वर्षे या पदावर आहेत. आता २०२९ मध्ये चौकार मारण्यास सज्ज आहेतच.
पंतप्रधान म्हणून मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शक्तीची 'सप्तधारा' प्रवाहित करण्याची भूमिका मांडली. १४०कोटी देशवासीयांच्या सामूहिक शक्तीच्या माध्यमातून हे स्वप्न वास्तवात बदलण्याचा त्यांचा संकल्प आहे. आज १७सप्टेंबर रोजी ७६ व्या वाढदिवसा निमित्त मा. मोदी यांना समस्त देशवासीयांच्याही शत शत शुभेच्छा. आपण सारे मोदी यांना वज्रमूठ साथ देऊ या...
वंदे मातरम.. भारत माता की जय
What's Your Reaction?