राम की जय
राम की जय तिसरा धक्का : विजयकुमार पिसे
भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आ.राम सातपुते यांची अवस्था बिकट झालेली दिसते. पंढरपूर येथे पंत परिचारकांच्या पुतळा अनावरणप्रसंगीच्या व्यासपीठावर विजयसिंह मोहिते पाटलांची हजेरी. त्यांचे सुपुत्र आ. रणजीतदादांवरील शिस्तपालन समितीच्या कारवाईची डोळेझाक पाहता भाजपाला अकलूजकर हवेतच. एक़ वेळ राम नसला तरी चालेल! अर्थात भाजपाच्या या रामावरील प्रेम कमी झाले असा अर्थ काढायचा काय? लोकसभा निवडणुकीतील रामभाऊ सोबतच्या समर्थकांनी आता तीन, चार ठिकाणी घरोबा केलाय. शिवाय मिळेल ती पालखी वाहताहेत.
अकलूजकरांच्या विरोधात कायम दंड थोपटून असलेले पक्षनिष्ठ के.के. यांनीही राम सातपुतेंवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आता त्यावर कडी केली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी. या घडमोडीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून फडणवीसांच्या गाडीत रामभाऊ बसले आहेत, एवढ्यात तिथून त्यांना बाहेर काढून ती जागा जयाभाऊनी पटकावली. त्यामुळे रामभाऊ की जयाभाऊ अशी तुलना केली तर सारे चित्र स्पष्ट होते. रामभाऊंचा बिकटवास सोलापुरातून सुरू झाला. प्रणितीतार्ई जिंकल्या. पण ताईंना मतदारांनी निवडून दिले नव्हे. जे रामभाऊंच्या इर्दगिर्द होते, अशी खास माणसं, त्यांनी ताईंना खासदारकी आंदण दिली म्हणे? हीच मंडळी सत्तेत आणि पक्षातही महत्वाच्या पदावर आहेत, काहींचे पक्षप्रवेश, घरवापसी. त्यामुळे फडणवीसांच्या गाडीतून रामभाऊ बाहेर कसे पडले? हा तिसरा धक्काच म्हणायचा का?
#जाता जाता 1सुखद धक्का#
*रामभाऊंच्या प्रयत्नांना जयाभाऊंची साथ! माळशिरस तालुक्यासाठी जिल्हा नियोजन मधून ३१ कोटी रुपये निधी मंजूर.
What's Your Reaction?