सामाजिक बांधिलकी जपणारा नेता : आमदार विजयकुमार देशमुख

लक्ष्यवेध...वाढदिवस विशेष! सामाजिक बांधिलकी जपणारा नेता : आमदार विजयकुमार देशमुख

Oct 21, 2025 - 00:13
 0  74
सामाजिक बांधिलकी जपणारा नेता : आमदार विजयकुमार देशमुख

शांत, संयमी, स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक राजकारणी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांची जाणीव ठेवून केलेले विकासाभिमुख काम यामुळे राजकारणात राहून समाजकारणी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक.  

    सोलापूर शहर व जिल्ह्यातील खेडोपाडी विकासाची गंगा पोहोचवणारे राजकारणी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांची जनमानसात ओळख आहे. पक्षनिष्ठा आणि विचार जपल्याने नवी ओळख निर्माण केली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सलग पाच वेळा शहर उत्तर मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजयी घोडदौड. मतदार संघावर मजबूत पकड अन् विकासाची दृष्टी असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपद दिले. पालकमंत्री झाल्यानंतर सबंध जिल्ह्याच्या विकासाची भूमिका घेऊन कोट्यवधींचा निधी खेचून आणला. त्यातूनच मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्‍वर स्मारकांचा प्रश्‍न मार्गी लावला.  

   आमदार, मंत्री म्हणून सोलापूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित. सोलापूरच्या इतिहासातील प्रसिद्ध श्री सिध्देश्‍वर देवस्थानचे मानकरी. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे स्वास्तिक सामाजिक संस्थेची स्थापना. या संस्थेच्या वतीने जनसेवेचे व्रत हाती घेत रक्तदान शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 2500 लोकांना दृष्टी देण्याचे पुण्य कर्म केले आहे. गरजू शालेय विध्यार्थाना 100 सायकलीचे वाटप, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती दिली. अशा अनेक सामाजिक उपक्रमांतून त्यांनी सामान्य माणसाचा विकास साधला. राजकारणाबरोबर सामाजिक कार्य करून समाजाविषयीचे आपले उत्तरदायित्व सिद्ध केले.

     सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील हैद्राबाद रोड येथील विडी घरकुलच्या विडी कामगारांना 3 हजार 38 घरे शासनाने 1988 मध्ये बांधून दिली होती. त्यामध्ये 20 हजार रुपये कामगारांचा हिस्सा होता, परंतु त्याकाठी हुडकोने कर्ज दिले. परंतु त्या कर्जाची परतफेड वेळेत कामगारांनी केली नाही. त्यामुळे त्यास हुडकोने व्याज लावले, ती रक्कम वाढून दोन कोटीपर्यंत गेली. गरीब विडी कामगारांना याची परत फेड करणे अवघड असल्याने साहेबांनी हा प्रश्‍न विधिमंडळात मांडला, ते स्वत: कामगारमंत्री असल्याने सतत पाठपुरावा करुन 2 कोटी व्याज माफ करुन घेतले. यामुळे महिला विडी कामगारांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्याच प्रयत्नाने दहिटणे येथे बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून 5000 घरकुलांचे बांधकाम होत आहे.

    पक्षाशी एकनिष्ठ हा त्यांचा गुणधर्म. आजच्या घडीला राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असताना आमदार महोदयांनी जनहिताचा दृष्टिकोन आत्मसात करून मार्गक्रमण करीत आहेत. गेल्या वीस वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला स्वच्छ चारित्र्याचा, निष्कलंक नेता म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख होय. यांच्या कार्याची स्तुती दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी केलेली आहे. राजकारण आणि समाजकारणाचा मेळ घालून विकास साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख. मितभाषी आमदार. त्यांनी दूरदृष्टीतून साकारलेली विकासकामे खूप काही बोलून जातात. आज त्यांचा वाढदिवस, यानिमित्त त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा! त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो!

- प्रा. डॉ. नारायण बनसोडे,

माजी नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा सोलापूर शहर. (9921886171)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow