राजकारणातील अजातशत्रू : आमदार विजयकुमार देशमुख
लक्ष्यवेध.. वाढदिवस विशेष। राजकारणातील अजातशत्रू : आमदार विजयकुमार देशमुख
सोलापूर जिल्ह्यातील राजकारणातील अजातशत्रू म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांना ओळखले जाते. तब्बल पाच वेळा शहर उत्तर विधानसभेतून निवडून विधिमंडळात जाण्याचा मान त्याना मिळाला. सदैव सोलापूर शहराच्या विकासासाठी धडपडणारा नेता त्यामुळे ही ओळख. पक्षनिष्ठा आणि पक्ष विचार जपल्याने त्यांची एक प्रतिमा पक्षीय राजकारणात निर्माण झाली आहे. स्वतःच्या मतदार संघावर मजबूत पकड अन् विकासाची दृष्टी. 2014 मध्ये पालकमंत्रिपद. जुना पुना नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात त्यांचा मोठे योगदान आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कै. लिंगराज वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्षाचे काम सक्षमपणे सुरु केले. सन 1989 च्या लोकसभेची निवडणूक,1990 च्या विधानसभेच्या निवडणुकीत नेते लिंगराज वल्याळ हे निवडून आले, त्यावेळी प्रचारात सक्रिय होते. सोलापूर महानगरपालिकेच्या 1992, 1997 आणि 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली.पक्ष संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ असल्यामुळे नेत्यांचा विश्वास.2002 मध्ये संघटनेत सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी. 2012 मध्ये भाजपचे शहराध्यक्ष.प्रत्येक निवडणुकीत प्रचार यंत्रणा, पक्ष संघटन वाढवणे यामुळे कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली.
2004 मध्ये सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात एकहाती विजय. हीच घटना विजयकुमार देशमुख यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी देणारी ठरली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 2009, सन 2014 ,सन 2019 आणि सन 2025 मध्ये ते पुन्हा निवडून आले. सन 2014 मध्ये विक्रमी 69000 इतक्या मताने विजयी झाले. तर सन 2019 मध्ये तर विरोधातल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करुन चौथ्यांदा विक्रमी विजयी झाले. सन 2025 मध्ये पाचव्यांदा निवडून आले. विजयाचा आलेख सतत चढता.
सिध्देश्वर साखर कारखान्यावर संचालक,सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून उत्तम कारभार केला. शहराध्यक्ष म्हणून 2012 मध्ये महानगरपालिकेत 25 नगरसेवक निवडून आणले. सन 2014 मध्ये शरद बनसोडे 2019 मध्ये जयसिध्देश्वर महास्वामी यांना खासदार म्हणून निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा. पक्षनिष्ठ कार्याची दखल घेतसन 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार व राज्य उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्रीपद मिळाले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही झाले. यानंतर त्यांनी सातत्याने विकास कामाचा सपाटा लावला. 2017 च्या निवडणुकीत पक्षाने निवडणुकीचे अधिकार आमदार विजयकुमार देशमुख यांना दिले. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत योग्य नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणा आणि मजबूत संघटन याच्या जोरावर महानगरपालिकेवर झेंडा फडकवला. अनुभव, बेरजेचे राजकारण, कुटनीती याच्या जोरावर पुन्हा एकदा महापालिकेत भाजपाची सत्ता येईल यात दुमत नाही. पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी 2026 च्या महानगरपालिका निवडणुकीत अनुभवी आ. विजयकुमार देशमुख यांना जबाबदारी द्यावी असे माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांला वाटते.
तसेच 2250 कोटी रुपयांची मंजुरी स्मार्ट सिटीसाठी प्राप्त, ज्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला. काँक्रीटचे रस्ते, ड्रेनेज लाईन आदी नागरी प्रश्न निकाली काढले. याशिवाय व सोलापूर ते उजनी दुहेरी पाईप योजना यांनी मंजूर करुन घेतली. यासाठी 667 कोटी 83 लाख रुपये मंजूर होवून आज हे काम प्रगतीपथावर आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि अवजड वाहनांचा शहरातील त्रास कमी होण्यासाठी जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन आणि जुना पुना नाका ते पत्रकार भवन असे दोन 960 कोटी रुपयांचे उड्डाणपुल मंजूर करण्यात आले. तसेच 299 कोटी रुपये स्वतंत्र भूसंपादनास मंजूर करुन घेतले. याशिवाय 100 खाटांचे हॉस्पिटल यांच्याच काळात मंजूर. हे हॉस्पिटल गरजू, सामान्य माणसांना जीवनदायी ठरले. राजकारण, पक्षभेद बाजूला ठेवून अशी अनेक लोकोपयोगी कामे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केली आहेत. विकासकामे करुनही मीडिया आणि प्रसिध्दीपासून दूर राहणे त्यांना आवडते. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा!
- प्रा. डॉ. नारायण बनसोडे,
माजी नगरसेवक तथा सरचिटणीस सोलापूर शहर.
(मो. नं.9921886171)
What's Your Reaction?