वक्फ बील... लगी सील!
देशात उगवली नवी पहाट! राज्यसभेत 12 तासाच्या चर्चेत वार, प्रहार। ठाकरे सेना वक्फच्या विरोधात तर शरद पवार गैरहजर!

ठाकरे सेना वक्फ विधेयकाच्या विरोधात राहिली. त्यामुळे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब असते तर... अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच शरद पवार या दिवशी सभागृहात हजर का नव्हते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वक्फ विरोधात मतदान करून हिंदू मतदारांशी द्रोह केला. सोलापूरकरांनी साथ दिली, पण ताईंने अपुन के साथ वफा नही किया, असाही सूर येत आहे.
(विजयकुमार पिसे)
सर्वाधिक मालमत्ता असूनही मुस्लिम समाजातील गरीब वर्गाची उन्नती न करणारे वक्फ बोर्ड आता खर्या अर्थाने कल्याणकारी होईल. सामाजिक, आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक असेल, हा आशावाद व्यक्त करीत केंद्र सरकारच्या वक्फ संशोधन बीलावर 12 तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर गुरुवारी पहाटे बहुमताने मुहर लागली। गेले अनेक महिने चर्चेचे केंद्रबिंदू ठरलेले वक्फ बील, लगी सील! ही नवी व्याख्या आहे. राज्यसभेत सत्ताधारी पक्षाकडे 125 सदस्यसंख्या असूनही अधिकची दोन मते मिळाली. आणि 128 विरुध्द 95 मतांच्या फरकाने वक्फ बील पास झाले. या विधेयकासाठी पहाटेपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू होते. तेव्हा सभापती जगदीप धनखड म्हणाले, ही एक दुर्मिळ घटना आहे.
वक्फ सुधारणा विधेयकावरून देशभरात उलट सुलट चर्चा होती. साहजिकच संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेसच्या इंडी आघाडीत चर्चेच्या दरम्यान वार, प्रहार पहायला मिळाले. 2 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अल्पसंख्यक विभागाचे मंत्री किरेन रिजीजू यांनी वक्फ संशोधन विधेयक राज्यसभेत मांडले. आणि मध्यरात्री नंतर पहाटे 2.30 वाजता हे विधेयक मंजूर झाले. पाठोपाठ मणिपूर राष्ट्रपती राजवटीवर सभागृहात चर्चा झाली. आणि पहाटे 4 वाजता सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. संसदेत मंजूर झालेले हे विधेयक आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार असून त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. दरम्यान सभागृहाबाहेर वक्फ विधेयकाला आव्हान देण्याची घोषणा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.
गेले दोन दिवस परदेश दौर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हे सामाजिक, आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण आहे. तसेच पुन्हा एकदा, व्यापक चर्चा आणि संवादाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यानच्या काळात विशेषतः मुस्लिम महिला, गरीब मुस्लिमांच्या हिताचे नुकसान झाले, ही बाब मोदी यांनी अधोरेखित केली आहे.
मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटले की, वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही. फक्त वक्फ मालमत्तांचे कामकाजाच्या संदर्भात आणि व्यवस्थापन सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर आहे. वक्फ संपत्तीचा वापर मुस्लिमांसाठीच, अशी ग्वाही त्यांनी दिली. इंडी आघाडी मुस्लिमांची दिशाभूल करत असून हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही, ते गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी आणले गेले आहे.
बाळासाहेब ठाकरे असते तर...
दरम्यान ठाकरे सेना वक्फ विधेयकाच्या विरोधात राहिली. त्यामुळे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब असते तर... अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच शरद पवार या दिवशी सभागृहात हजर का नव्हते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी वक्फ विरोधात मतदान करून हिंदू मतदारांशी द्रोह केला. सोलापूरकरांनी साथ दिली, पण ताईंने अपुन के साथ वफा नही किया, असाही सूर येत आहे.
What's Your Reaction?






