स्व.चेतन गुर्रम स्मरणार्थ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी

स्व.चेतन गुर्रम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

Aug 10, 2024 - 11:42
 0  63
स्व.चेतन गुर्रम स्मरणार्थ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते स्व.चेतन गुर्रम यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात १८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ८३ रुग्णांचे रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आला.
सर्वांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे.त्याच दिवशी अनेक रूग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रियाही करण्यात आली.
यावेळी मरणोत्तर नेत्रदाता स्व.चेतन यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वेच्छेने मित्र परिवार व गुर्रम कुटुंबियांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करून संमती पत्र जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती नेत्रदान  समुपदेशक विकास लिंगराज यांच्याकडे भरून दिले


 स्व.चेतन गुर्रम यांची प्रतिमा पूजन विश्वस्त श्री यादगिरी बोम्मा, अंबादास चिंताकिंदी,भुपती कमटम,सुधाकर सिंघम,प्रकाश इप्पलपल्ली, डॉ.प्रकाश ताटी,रोटरी सचिव नरसिम्हा कनकी, सिध्देश्वर गड्डम,परशुराम रापेल्ली, चार्वाक बुर्गुल,रमेश कमटम,गणेश इराबत्ती,राजु गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सत्यनारायण गुर्रम, सदानंद गुंडेटी, श्रेयश गुजर,विवेक गुंडेटी, पुंडलिक गुर्रम,पवन बोम्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी महापौर श्रीकांचना यन्नम,भाजपा महिला अध्यक्षा विजयाताई वड्डेपल्ली,नागेश सरगम, रवी गोणे,सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला यांनी भेट दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow