गुरू बमलिंगेश्‍वर बृहन्मठ मंदिरास कोटीचा निधी : आ. कोठे

विष्णुपंतनगर, मल्लिकार्जुन नगरातील रस्ते व मूलभूत सुविधा भविष्यातही समस्या सोडवण्याची ग्वाही

Jun 17, 2026 - 00:12
 0  96
गुरू बमलिंगेश्‍वर बृहन्मठ मंदिरास कोटीचा निधी : आ. कोठे

सोलापूर : श्री गुरु बमलिंगेश्‍वर बृहन्मठ संस्था विष्णुपंत नगर अक्कलकोट रोड येथील मंदिरास  एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा आ. देवेंद्र कोठे यांनी केली. अधिक मासानिमित्त मठात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास आ. कोठे  उपस्थित होते.
   यावेळी काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची इष्टलिंग पूजा,  जगदगुरु उत्सव, धर्मसभा आणि सांगता सोहळा पार पडला. व्यासपीठावर रंभापुरी जगद्गुरु डॉ. वीरसोमेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी, काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्‍वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती.आ.देवेंद्र कोठे म्हणाले, श्री गुरु बमलिंगेश्‍वर बृहन्मठ संस्था  मंदिराच्या सभा मंडपासाठी एक कोटींचा निधी, तसेच विष्णुपंत नगरातील रस्ते 40 लाख, मल्लिकार्जुन नगरातील प्रलंबित मुख्य रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून रस्ते व मूलभूत सुविधांसाठी यापूर्वीही  विकासनिधी उपलब्ध देण्यात आला आहे.  भविष्यातही  समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही आ.देवेंद्र कोठे याप्रसंगी दिली.   
   याप्रसंगी नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, माजी खा.डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. शैलेश पाटील, नगरसेवक अजय पोन्नम, मीनाक्षी कडगंची, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, गुरुशांत धुत्तरगांवकर, प्रकाश वाले, मल्लिनाथ मसरे, अप्पू कडगंची उपस्थित होते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow