अटलजी, लालजींमुळे 'नवभाजपा'यींना अच्छे दिन!
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलेल्या भाजपचा राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख शक्ती म्हणून झालेला प्रवास हा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाचा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे परिश्रम, वैचारिक भूमिका आणि १९९० मधील सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा या घटनांनी भाजपच्या राजकीय विस्ताराला दिशा दिली. आज पक्षात प्रवेश करणाऱ्या आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या नव्या पिढीने भाजपच्या या संघर्षमय इतिहासाची जाणीव ठेवावी, हा या स्फुटलेखाचा मुख्य संदेश आहे.
(विजयकुमार पिसे, विभाग मंत्री विहिंप)
दोन दिवसांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा "शतकपूर्तीच्या दिशेने..." हा लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी कृतज्ञभाव व्यक्त करणारा लेख प्रसिध्द झाला होता. याच श्रृंखलेतील हे स्फुट. आजच्या इनकमिंग रेडकार्पेट तसेच लगेच सत्ता आणि खुर्च्या पटकावणार्या "नवभाजपा"यींनी लक्षात घेतले पाहिजे की 'अच्छे दिन'चा अर्थ काय, त्यामागचा इतिहास,परिश्रम, त्याग आणि कष्ट.
म्हटले तर भाजपाचे शिल्पकार लालकृष्ण अडवाणी यांचे नाव सर्वप्रथम घेता येईल. आजच्या काळातील भाजपाचं सामर्थ्य पाहताना, त्याच्या उभारणीसाठी आयुष्य वेचलेल्या नेतृत्वाची आठवण ठेवणे क्रमप्राप्त होय. त्या नेतृत्वातील अग्रगण्य जोडी म्हणजे अटलजी आणि लालजी.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी ही जोडी म्हणजे भाजपाच्या उभारणीची आणि कर्तृत्वाची देण आहे. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागांवर भाजपला यश मिळाले, जणू हा पक्ष संपल्यात जमा. इंदिराजींच्या हत्येमुळे सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधी यांना प्रचंड बहुमत मिळाले, यामध्ये भाजपाची वाताहत झाली. ६ एप्रिल १९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपाची तशी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक.
पण या दारुण पराजयानंतर राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख शक्ती बनवण्यात अडवाणींचे व अटलजींचे मोठे योगदान आहे. या प्रवासात अनेक नेते आणि असंख्य कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत. अटलबिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांच्या नेतृत्वाने या सामूहिक प्रयत्नांना जी दिशा म्हणजे भाजपाची टर्निंग पॉईंट. त्यानंतरच खर्या अर्थाने भाजपाच्या अच्छे दिनाची सुरवात होय १९८६ मध्ये पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर अडवाणींनी संघटना मजबूत करण्यावर, कार्यकर्त्यांना जोडण्यावर आणि पक्षाची राजकीय भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला.
वाजपेयींचं व्यापक जनआवाहन आणि अडवाणींचं संघटनकौशल्य या दोन्हींचा भाजपच्या व्यापक विस्ताराला उपयोग झाला. तेव्हा मिसकॉल द्या, आणि.. १९८४ मध्ये २ जागा १९८९ मध्ये ८५, १९९१ मध्ये १२० आणि १९९६ मध्ये १६१ जागांसह लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष भाजपा. हा प्रवास सहज घडलेला नव्हता. नाही. त्यामागे सातत्याने चिवट आणि चिकाटीने केलेले संघटनात्मक काम आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत उभारलेलं जनसमर्थन होतं. त्यातूनच भाजपाचे सामर्थ्य वाढत गेले.
आठवा १९९० ची सोमनाथ ते अयोध्या रामजन्मभूमी रथयात्रा. त्यांच्या आणि भाजपाच्या राजकीय आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरली. अडवाणी यांनी रामजन्मभूमीचा मुद्दा आणि भाजपची भूमिका या रथयात्रेच्या माध्यमातून देशभर पोहोचवली. या काळात राजकारण, समाजकारण याविषयी तीव्र मतभेद होते, टीका टिपणी होती. माध्यमांनी भाजपाला, संघ विचाराला, तसेच विहिंपच्या रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाविषयी प्रतिकूल नॅरेटिव तयार केला. कारसेवेच्या काळात लाखो रामभक्त व कारसेवकांनी अनुभवला, पाहिला देखील, असो.
मात्र भारतीय राजकारणावर आणि भाजपच्या विस्तारावर झालेला त्याचा परिणाम नंतरच्या काळात दुर्लक्षित करता येत नाही, हे ही तितकेच खरे. सत्ता दूर असताना पक्षासाठी काम करणं, पराभवानंतर कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणं आणि संघटनेला पुन्हा उभं करणं या कसोट्यांवर अडवाणींच्या योगदानाचं महत्त्व लक्षात येते. त्या दृष्टीने त्याची जाणीव तत्कालिन कार्यकर्त्यांना आहे, म्हणून आजच्या "नवभाजपा"यींच्या अच्छे दिनाकडे पाहताना दृष्टीकोन लक्षात येतो. लालकृष्ण अडवाणी ८ नोव्हेंबर रोजी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून १०० व्या वर्षात प्रवेश करत आहेत. भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो. भाजपला राष्ट्रीय पातळीवर उभं करणारे प्रमुख शिल्पकार, त्यांच्या शतकारंभ वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तम आयुरारोग्य लाभो, अशा शुभकामना!
What's Your Reaction?