अशक्य ते शक्य करतील, कार्यतप्तर नगरसेविका अनिता व्यंकटेश कोंडी

अशक्य ते शक्य करतील कार्यतप्तर नगरसेविका अनिता व्यंकटेश कोंडी (प्रभाग 19 आकाशवाणी नीलमनगर परिसर)

Mar 2, 2025 - 12:47
Mar 4, 2025 - 13:36
 0  254
अशक्य ते शक्य करतील, कार्यतप्तर नगरसेविका अनिता व्यंकटेश कोंडी

अशक्य ते शक्य करतील.... अशी ओळख खूप कमी लोकप्रतिनिधींची असते.  कार्यतत्पर लोकप्रतिनिधी नगरसेविका म्हणजे नीलमनगर आकाशवाणी या हद्दवाढ भागातील अनिता व्यंकटेश कोंडी यांचे नाव आवर्जून घेता येईल. 2002 पासून कोंडी या भागातून निवडून येतात. त्यांचे पती व्यंकटेश कोंडी हे भाजपाचे हार्डवर्क कार्यकर्ते. कार्यकर्ता कसा असावा, तो लोकोपयोगी कसा असावा हे आदर्श उदाहरण. कमी शिक्षण, विडी कामगार, स्वत: कष्टकरी. त्यामुळे सर्वसामान्यांविषयी नेहमीच कणव. काम कोणतेही आणि किती अवघड असो, ते पूर्ण करून देण्याची हमी. त्यामुळे लोकवर्गणी काढून अनिता कोंडी यांना पुन्हा पुन्हा प्रभागात निवडून येण्यासाठी लोक, नागरिक स्वत: पुढाकार घेतात. भाजपा पक्ष आणि नेतेमंडळी देखील त्यांच्या लोकहित कार्याची दखल घेतात, असा अनुभव विरळाच म्हणता येईल. 


नगरसेविका कोंडी या प्रभागातील मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी नेहमीच आग्रही राहिल्या आहेत. त्यामुळे अवघ्या 24 तासात   आवश्यक अशा ठिकाणी बोअरिंग मारून पाण्याची व्यवस्था केली. जिथे राडारोडा, दलदलीचा भाग होता, तिथे आधी मोठे सिमेंट पाईप घातले. पाण्याच्या प्रवाहास वाट करून दिली. आणि मुरूम, भरावाने कच्चा रस्ता केला. पक्के रस्ते बांधले. प्रभागात ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले. तसेच पथदिवे बसवून प्रभाग प्रकाशमय केला. हद्दवाढ भाग म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष्य. टँक़रने पाणी पुरवठा होणारा परिसर आता टँकरमुक्त केला. कोंडी यांच्या विकासात्मक कार्याची दखल आमदार सुभाषबापू देशमुख यांनी घेतली. प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. तसेच पक्षाचे सरचिटणीस मनीष भैय्या देशमुख यांनीही प्रभागाकडे तसेच संघटनात्मक कामासाठी मार्गदर्शन असते.  


अनिता व्यंकटेश कोंडी यांचे ठळक़ कार्य म्हणजे प्रधानमंत्री योजना. अनेक लाभार्थींना लाभ मिळवून देण्यात त्यांची आघाडी आहे.  याशिवाय महिला बाल कल्याण योजनेचा पुरेपूर वापर त्यांनी विडी कामगार, कष्टकरी वर्ग यांच्या हितासाठी केला.  पीएम उज्वला गॅस योजना 2000 लाभार्थी. जनधन बँक़ खाती 4500. या लाभार्थ्यांना 1.25 कोटींचे कर्ज वितरण. पीएम आवास योजना 800 जणांना हक्काचा निवारा. लॉकडाउन काळात जनधन योजनेच्या 4500 खातेदारांना प्रत्येकी 1500 रुपये मिळवून दिले. लॉकडाउन काळात 800 कुटुंबाना गहू तांदूळ वाटप. 1000 केशरी कार्डधारकांना सरकारी धान्याचा लाभ. 30 मयत वारसांना प्रत्येकी 30 हजार रुपयांची मदत. महिला बाल कल्याण योजनेतून शिलाई मशीन मिळवून दिले. रोजगाराची संधी म्हणजे 40 महिला स्वयंपूर्ण झाल्या. तरुण उद्योजकांना मुद्रा लोण. 4500 शालेय विद्यार्थिनी मुलींना मोफत बस प्रवास पास,  स्कूल बॅग, टिफीन बॉक्स. जि.प. शाळेत पिण्याच्या पाण्याचे आरो फिल्टर मशीन सेट. मागेल त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार बोअर कूपनलिका. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत मनपा शाळेत 2.50 लाखांच्या निधीतून मुलींसाठी स्वच्छतागॄहाची उभारणी. कोरोना काळात विडी कारखाने बेमुदत बंद होते, रोजगार बुडाला. त्यामुळे कारखाने सुरू करण्यासाठी पुढाकार. विडी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी, आरोग्य शिबीर, 350 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी. सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेनुसार 250 लोखंडी बाकडे, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 199 अष्टकोनी विद्युत पोल आणि 80 आरजी पोल. राज्य सरकारची लोकप्रिय लाडकी बहीण योजनेचा 2880 लाडक्या बहिणींना लाभ मिळवून दिला. 


सार्वजनिक आरोग्य विशेषत: महिला प्रसूती गृहाची गरज आहे, ही सुविधा हद्दवाढ भागात कोठेही नाही, हे लक्षात घेवून अनिता कोंडी यांनी तत्कालिन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे निवेदनादवारे मार्च 2023 मध्ये मागणी केली होती. अशी मागणी आणि पुढाकार घेणारे हद्दवाढ भागातील कोंडी एकमेव नगरसेवक. विशेष म्हणजे पीएम योजनेतून 10 हजार लोकसंख्येच्या परिसरात हद्दवाढ भागासाठी प्रसूतीगृह उभारता येईल, असे त्यांचे मत आहे. 


लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभागातून भाजपा उमेदवारांना दणदणीत मतदानाची आणि मताधिक्याची गॅरंटी. हे सातत्य कायम टिकविले. यामागचे इंगित म्हणजे अनिता कोंडी आणि त्यांचे पती व्यंकटेश कोंडी जनसेवेसाठी तत्पर लोकप्रतिनिधी, नगरसेविका, आणि हार्डवर्क कार्यकर्ता ही ओळख. त्यासाठी म्हणतात ना.... अशक्य ते शक्य करतील कोंडी पती पत्नीद्वय. जे ट्वेेन्टीफोर बाय सेवन उपलब्ध असतात. प्रभाग अध्यक्ष म्हणून 1992 मध्ये भाजपा कार्याची सुरवात. आणि पहिल्याच प्रयत्नात या भागातून भाजपा नगरसेेवक उमेदवार निवडून आणण्यात पुढाकार. भाजपा मंडल उपाध्यक्ष, शहर कार्यकारिणी सदस्य तसेच पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्‍वस्त. 2012 मध्ये निवडणूक  प्रमुख दायित्व पार पाडण्याची  कसोटी होती, ती यशस्वीपणे निभावली.  


विडी कामगारांच्या कौशल्याची चुणूक म्हणजे विड्या वळण्याची स्पर्धा भरविली. तेलुगू भाषिकांचा पारंपरिक ब्रतुकम्माचा खेळ खूपच रंगला, यावेळी महिलांच्या मोठ्या उपस्थितीचे खूप कौतुक झाले. तसेच प्रभागातील शाळांमध्ये आणि विडी कामगार महिलांचे सामूहिक रक्षाबंधनाचे कार्यक्रमही श्री व सौ. कोंडी यांनी घेतले. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम व उपक्रम देखील त्यांच्या प्रभागात होतात. आणि याप्रसंगी मिळणारा प्रतिसाद सर्व रहिवासी नागरिकांना प्रेरणादायी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow