पारधी समाजातील आदर्श नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण
पारधी समाजातील आदर्श नगरसेविका पुरस्कार प्राप्त राजश्री अनिल चव्हाण (प्रभाग 26सोरेगाव, कुमठे गाव, जुळे सोलापूर परिसर)

सेटलमेंट रामवाडी ही ब्रिटिश कालिन वसाहत. राजश्री चव्हाण या मूळच्या या परिसरातील. गतवेळी त्यांना भाजपाने महापालिका निवडणुकीत संधी दिली. त्या पहिल्याच प्रयत्नात निवडूनही आल्या. नगरसेविका म्हणून कार्यरत असताना आदर्श नगरसेविका म्हणून सन्मानितही झाल्या. समाजहितातच देशहित आहे, हे मनाशी ठाण मांडून प्रभाग 26 मध्ये कार्यरत राहिल्या. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या विकासात्मक भूमिकेला न्याय दिला. घराघरापर्यंत पक्ष पोहोचविला. पक्षाचे कार्य समाजासमोर उभे केले. तसेच अनेकजण पक्षाशी जोडले. अर्थात भाजपाचा विस्तार आणखी मोठा केला. समाजात जनजागृती केली.
राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत नगरसेविका राजश्री चव्हाण....
भाजपा म्हणजे लोकहितं मम करणीयम. आणि लोकहिताची कामे पारदर्शकपणे तडीस नेली. त्यांच्या जनजागरणामुळे अनेक लोक पक्षाशी जोडले गेले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्यांच्यावर भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश मोर्चा कार्यकारणी सदस्य हे दायित्व सोपवले. सामाजिक उपक्रम करणारे महाराष्ट्रातील नावाजलेले प्रतिष्ठित आई प्रतिष्ठान व माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने समाजात व प्रभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श नगरसेविका म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आदर्श नगरसेविका पुरस्कार स्विकारताना राजश्री चव्हाण.
प्रभाग 26 मधील अत्यंत महत्त्वाचा असणारा परिसर. त्यास अनुषंगाने मंजूर पाच डीपी रस्त्यांचे सर्वे करून शासन दरबारी व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांना सांगितले की, सदर रस्ते झाल्याने प्रभाग 26 मधील नागरिकांच्या समस्या कायमस्वरूपी दूर होतील. सर्व नागरिक हे भाजप पक्षाच्या पाठीशी राहतील हा संकल्प तडीस नेला. कोरोना काळात लोकांना बाहेर फिरणे मुश्किल झाले होते. नागरिक भीतीने घरात बसून होते. त्यावेळी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांनी गरजूंना घरोघरी जाऊन कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर, अन्नदान वाटप केले. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी जुळे सोलापूर येथे डॉक्टर बगले यांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड लस सेंटर चालू करून अनेक नागरिकांचे प्राण वाचवले आहे. कुमठा नाका मुमताज नगर येथील स्वामी समर्थ मूकबधिर शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, ड्रेस, वह्या पुस्तके वाटप करून सामाजिक उपक्रम नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केला. या उपक्रमाचे समाजातून त्यांचे कौतुक झाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत
जुळे सोलापूर व शहरातील अंगणवाडी सेविका यांचे वेतन वाढविण्यासाठी सोलापूर महानगरपालिका येथे आयुक्त शितल तेली उगले यांना निवेदन दिले. महायुतीचे शिवसेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री अण्णाप्पा सतुबर व पदाधिकारी यांच्या वतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपा प्रदेश कार्यकारणी बैठकीत आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना समाजातील व्यथा सांगितल्या व ते प्राधान्याने मान्य करू असे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या मागण्या मान्य करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
आदिवासी समाजाच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा 8 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त सन्मान.
नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वतीने त्यांचा भव्य दिव्य सत्कार झाला. महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा, तसेच आदिवासी पारधी समाजातील बेघर लोकांसाठी घरकुल योजनेचा फायदा होईल यासाठी आदिवासी मंत्री श्री विजयकुमार गावित साहेब यांना निवेदन देऊन सदर कामे मंजूर करून घेतली. ही विशेष दखल घेणारी कौतुकास्पद कामगिरी पार पाडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना मताधिक्य मिळवून दिले. तसेच अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघात नाशिक, दिंडोरी, कळवण या ठिकाणी राज्यस्तरावर प्रचार यंत्रणा राबविली.
प्रभाग 26 विकास कामाचा शुभारंभ. बोअरवेल मारून पाणी समस्येवर मात.
पती श्री.अनिल चव्हाण हे पत्नीच्या पाठिशी राहून हा सारा व्याप पूर्णत्वास नेला. प्रभागातील विकास कामासाठी शासन दरबारी व सोलापूर महानगरपालिकेतून निधी उपलब्ध करून घेऊन हद्दवाढ भागातील अनेक नागरी वसाहती, सोसायट्या, नागरी वस्ती, नगरांचा कायापालट केल्यामुळे नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा प्रभागातील नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची प्रदेश अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर ते सोलापुरात आल्यानंतर त्यांचा मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापुरातील आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांचे समवेत नगरसेविका सौ राजश्री अनिल चव्हाण या देखील उपस्थित होत्या.
What's Your Reaction?






